शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

कुळधरणला भरतो असुविधांचा बाजार ओटे, पिण्याचे पाणी, पार्किंग सुविधांचा अभाव

By admin | Published: April 04, 2015 1:54 AM

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरणच्या आठवडे बाजारात ग्रामपंचायतकडून विक्रेते तसेच बाजारकरुंसाठी सुविधाच पुरविल्या जात नाहीत. तालुक्याच्या विविध भागातून येणार्‍या ग्राहकांची गैरसोय होत असून, विक्रेते असुविधेमुळे त्रस्त आहेत.

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरणच्या आठवडे बाजारात ग्रामपंचायतकडून विक्रेते तसेच बाजारकरुंसाठी सुविधाच पुरविल्या जात नाहीत. तालुक्याच्या विविध भागातून येणार्‍या ग्राहकांची गैरसोय होत असून, विक्रेते असुविधेमुळे त्रस्त आहेत.
तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कुळधरण येथील शुक्रवारच्या आठवडे बाजारातील गैरसोयीने विक्रेत्यांमध्ये असंतोष आहे. बाजारात ओट्यांचे बांधकाम झाले नसल्याने विक्रेत्यांना जमिनीवरच बसावे लागते. जमिनीवरच दुकाने थाटल्याने मोकाट जनावरांना आवरताना मोठी कसरत होते. ग्राहकांच्या पायाची धूळ विक्रीच्या मालात जात असल्याने मालाचे नुकसान होते. तंबाखू, खाद्य तेल विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसतो.
बाजारात ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्याची कसलीच व्यवस्था केली जात नसल्याने विक्रेते व ग्राहकांना लाचारी पत्करत पाणी मागत फिरावे लागते. त्यामुळे बाहेरगावच्या नागरिकांची हेळसांड होते. पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने विक्रेत्यांची मालवाहतूक करणारी वाहने अस्ताव्यस्तपणे बाजार परिसरात लावली जातात. अनेक वाहने जगदंबा मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत लावली जात असल्याने भाविकांची मंदिरात जाण्यासाठी कसरत होते. पार्किंगअभावी वाहने कोठेही उभी करावी लागत असल्याने वाहनांच्या इंधनाची चोरी, हवा सोडून देणे, असे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिन्यात ---- ----- --- ---- चोरीस गेल्याने विक्रेते चिंतेत ----- ----
जगदंबा मंदिरालगत मारुती मंदिराभोवती बाजार भरत असून, परिसरात वृक्ष लागवड केली नसल्याने उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. सुविधा न पुरवता ग्रामपंचायतीकडून भरमसाठ कर वसुली केली जाते. कुळधरणसह, सुपेकरवाडी, पिंपळवाडी, धालवडी, राक्षसवाडी, कोपर्डी, हिवरवाडी आदी भागातील शेतकरी शेतातील माल, पालेभाज्या विक्रीस आणतात; तसेच राशीन, मिरजगाव, कर्जत तसेच करमाळा तालुक्यातून अनेक विक्रेते येथे बाजारात विक्री करण्यासाठी येतात. मात्र सुविधाच मिळत नसल्याने विक्रेते तसेच बाजारकरु वैतागून गेले आहेत.

नियोजनाचा अभाव
अनेक विक्रेते बाजारतळ सोडून मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत तसेच वडाच्या झाडाखाली बसतात. आईस्क्रीम, अंडे, घड्याळ विक्रेते तसेच चर्मकार रस्त्यावरच दुकाने थाटत असल्याने ग्राहकांना बाजारापर्यंत पोहोचनेही कठीण जाते. मंगल कार्यालयासमोरच्या मोकळ्या जागेत पार्किंग करणे सहज शक्य असतानाही नियोजनाच्या अभावाचा फटका नागरिकांना बसतो.
(अपूर्ण.....)