क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, ज्योतिरादित्य शिंदेंचा जोरदार शॉट; भाजप कार्यकर्ताच जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 10:33 PM2023-02-15T22:33:06+5:302023-02-15T22:33:29+5:30
ज्योतिरादित्य शिंदे हे नव्या क्रिकेट स्टेडिअमच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते.
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात बुधवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बॅटमधून निघालेला चेंडू एका भाजप कार्यकर्त्याच्या डोक्याला लागला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. यानंतर, त्यांना जखमी अवस्थेत शिंदे यांच्या कारने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री शिंदे हेदेखील त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे बुधवारी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एमपीसीए) नव्याने बांधलेल्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यासाठी मध्य प्रदेशातील रीवा येथे पोहोचले होते.
रीवा में नवनिर्मित क्रिकेट स्टेडियम के उद्घाटन समारोह में सर्वश्री @Janardan_BJP, @rshuklabjp, @NSinghMLABJP, कमल श्रीवास्तव, @MPCAtweets के अध्यक्ष श्री अभिलाष खांडेकर व अन्य विधायकगण के साथ सम्मिलित हुआ। (1/2) pic.twitter.com/Qw1LguIs76
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) February 15, 2023
दीनदयाल मंडळाचे उपाध्यक्ष विकास मिश्रा स्टेडियममध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी चेंडू त्यांच्या डोक्याला लागला. यामुळे विकास हे गंभीर जखमी झाले. यानंतर विकास यांना तात्काळ ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीतून संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जखमी विकास यांना पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रुग्णालयात पोहोचून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.