- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नव्या संसदेचे रविवारी, २८ मे रोजी विधिवत पूजा आणि होमहवनाने उद्घाटन होणार आहे. तामिळनाडूतील २० आणि वाराणसीतील १२ पंडितांकडून ही विधिवत पूजा केली जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता होमहवनाला सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश पूजेला बसतील. त्यानंतर वैदिक पद्धतीने लोकसभेमध्ये राजदंड विराजमान केला जाईल.
पूजाविधी पार पडल्यानंतर संसदेच्या इतिहासावर आधारित दोन शॉर्टफिल्म्स दाखवल्या जातील. यावेळी केंद्र सरकारकडून विशेष नाणे आणि डाक तिकीट जारी केले जाईल.
राष्ट्रपतींद्वारे उद्घाटन; आज काेर्टात सुनावणीn नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींद्वारे व्हावे, त्याबाबत लोकसभा सचिवालयाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. n राष्ट्रपतींसह लोकसभा आणि राज्यसभेचा समावेश होतो. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनावेळी राष्ट्रपती दोन्ही सभागृहाला संबोधित करतात. परंतु, उद्घाटनाला त्यांना निमंत्रित न करणे, हे संविधानाचा अवमान असल्याचे याचिकेत म्हटले आहे.