शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

सेतू भारतम प्रकल्पाचे उद्घाटन : देशभरात होणार २०८ नवे पूल

By admin | Published: March 05, 2016 4:21 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महत्त्वाकांक्षी ‘सेतू भारतम्’ प्रकल्पाचे उद्घाटन केले. किमान ५० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून २०१९पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग

प्रमोद गवळी,  नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महत्त्वाकांक्षी ‘सेतू भारतम्’ प्रकल्पाचे उद्घाटन केले. किमान ५० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून २०१९पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वेक्रॉसिंगपासून मुक्त केले जातील. या प्रकल्पांतर्गत एकूण २०८ मार्गांवरील पूल उभारले जाणार असून, महाराष्ट्रातील १२ पुलांचा त्यात समावेश आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर क्षेत्रातील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरीसह ६ मार्गांचा त्यात समावेश आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर रस्त्यांचा विकास अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची कोनशिला बसविल्याबद्दल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे आभार मानले. रेल्वेमार्गावर क्रॉसिंग पूल तसेच आवश्यकता असेल तेथे अंडरब्रीज उभारण्यासाठी ‘सेतू भारतम्’ योजना तयार करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये प्रकल्पाच्या निविदा जारी केल्या जातील.विदर्भातील मार्गनागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागातील सावनेर- धापेवाडा- कळमेश्वर- गोंडखैरी, आंध्र प्रदेश सीमेवरील गडचिरोलीमध्ये कारंजी- वणी- चंद्रपूर- मूल-सावली, गडचिरोली जिल्ह्यातील साकोली- लाखांदूर, वडसा- गडचिरोली-चार्मोशी- आष्टी- सिरोंचा, नागपूर जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर-नागभीड, ब्रह्मपुरी-आरमोरी,अकोला- वाशिम.महाराष्ट्रातील उर्वरित मार्ग....सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधील रत्नागिरी-सांगोला- मंगळवेढा- सोलापूर, सोलापूर- अक्कलकोट- दुधनी-चौदापूर- गानगापूर- गुलबर्गा, हिंगोली- नांदेड- देगलूर, रत्नागिरी- सांगोला- मंगळवेढा- सोलापूर, सोलापूर- वीजापूर मार्गअन्य राज्यांमधील पूल असे आहेत आंध्र प्रदेश ३३, आसाम १२, बिहार २०, छत्तीसगड ५, गुजरात ८, हरियाणा १०, हिमाचल प्रदेश ५, झारखंड ११, कर्नाटक १७, केरळ ४, मध्यप्रदेश ६, ओडिशा ४, पंजाब १०, राजस्थान ९, उत्तराखंड २, उत्तर प्रदेश ९ आणि प.बंगालमधील २२ पुलांचा या योजनेत समावेश आहे.