पोल्ट्री फार्मवरील कोंबड्या कापून फेकल्या वडली येथील घटना : ६० हजाराचे नुकसान, तक्रार दाखल
By admin | Published: April 02, 2016 11:51 PM
जळगाव: तालुक्यातील वडली येथे पोल्ट्री फार्मवर सुमारे ५० ते ६० गावरानी कोंबड्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जागेवरच कापून फेकल्या तर दीडशेच्यावर कोंबड्यांची चोरी झाली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. यात ६० हजारांच्यावर नुकसान झाले आहे. पशुसंवर्धन विभागाला कळवूनही त्यांनी पंचनामा केलेला नाही. याबाबत पोलीस स्टेशनकडे तक्रार करण्यात आली आहे.
जळगाव: तालुक्यातील वडली येथे पोल्ट्री फार्मवर सुमारे ५० ते ६० गावरानी कोंबड्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जागेवरच कापून फेकल्या तर दीडशेच्यावर कोंबड्यांची चोरी झाली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. यात ६० हजारांच्यावर नुकसान झाले आहे. पशुसंवर्धन विभागाला कळवूनही त्यांनी पंचनामा केलेला नाही. याबाबत पोलीस स्टेशनकडे तक्रार करण्यात आली आहे.वडली येथे पाचोरा रस्त्यावर गावाला लागूनच भगवान बळीराम पाटील यांच्या मालकीचा पोल्ट्री फार्म आहे. त्या फार्ममध्ये दिलीप पौलाद पाटील यांनी काही दिवसापूर्वीच कर्ज काढून व आईचे सोने मोडून ९० हजार रुपयांच्या गावरानी कोंबडे व कोंबड्या आणल्या होत्या. विक्रीला चांगला प्रतिसाद लाभत असतानाच शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारच्या पहाटे विकृत व्यक्ती किंवा चोरट्याने त्यातील काही कोंबड्या कापून जागेवरच फेकून दिल्या तर सुमारे दीडशेच्या जवळपास कोंबड्या लांबवण्यात आल्या. दिलीप पाटील हे सकाळी नऊ वाजता पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना खाद्य व पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना कोंबड्या मेलेल्या अवस्थेत दिसून आल्या तर काही कोंबड्या गायब झाल्याचे लक्षात आले. दरवाजाही उघडा दिसला. दरम्यान, झाल्याप्रकाराबाबत त्यांनी म्हसावद दूरक्षेत्राला तक्रार केली आहे तर पशुसंवर्धन विभागाकडे गेले असता त्यांच्या दवाखान्यात कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रारही करता आली नाही व पंचनामाही झाला नाही.कोट..दुष्काळामुळे शेतीत उत्पन्न येत नसल्याने पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्याजाने पैसे काढून तसेच आईचे सोने मोडून एक लाख रुपये जमवून कोंबड्या आणल्या होत्या. या प्रकारामुळे आमच्या कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.-दिलीप पाटील, पोल्ट्री फार्मचालक