नवी दिल्ली : क्किममधील सीमेवर भारत व चीनचे सैनिक आमने-सामने आले. यावेळी भारतीय लष्कर आणि चिनी पीएलए सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये दोन्हीकडील सैनिक जखमी झाल्याचे समजते. यामुळे सिक्किममधील भारत-चीन सीमेवर काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
उत्तरी सिक्कीम येथील नाकुला सेक्टरमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक जखमी झाले. त्यानंतर निश्चित यंत्रणेसह स्थानिक पातळीवर प्रकरण निकाली काढले गेले. थोड्या काळासाठी हा तात्पुरता संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही सैन्यांमधील संघर्षाचा हा प्रकार बर्याच दिवसांनी घडला. या संपूर्ण घटनेबाबत अधिकृत माहिती ईस्टर्न कमांड देणार आहे.
दरम्यान, चीनच्या सैनिकांचा उद्दामपणा भारतीय लष्कराला काही नवीन नाही. ऑगस्ट २०१७ मध्येही अशीच घटना घडली होती. लडाखमध्ये हा प्रकार घडला होता. त्यावेळी एकमेकांवर दगडफेकही झाली होती.
लिपुलेख-मानसरोवर लिंक रोड तयारभारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका दुर्गम मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर आता नेपाळमध्ये विरोध प्रदर्शन सुरू झाले आहे. यावर नेपाळ सरकारने कडक शब्दात आक्षेप घेतला असून, लिपुलेखवर पुन्हा दावा केला आहे. दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सर्व काम भारतीय हद्दीतच झाल्याचे सांगत नेपाळचा दावा खोडून काढला आहे. हा भाग उत्तराखंड राज्यातील पिथोरागडचा हिस्सा आहे. पण नेपाळने याला कायमच विरोध केलेला आहे. या नव्या रस्त्यामुळे आता भारतीय चौक्यांपर्यंत पोहोचणे सहजशक्य होणार आहे. 17000 फूट उंचीची लिपुलेख खिंड उत्तराखंडच्या धारचुलाशी सहज जोडली जाणार आहे. या रस्त्याची लांबी 80 किलोमीटर आहे. लिपुलेख खिंडीतून मानसरोवर सुमारे 90किमी अंतरावर आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; फोन कॉल लीक
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली
CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल