नवी दिल्ली : सन २०१४-१५ च्या तुलनेत देशाची दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात यंदा सुमारे ३५.१२% वाढ होत ती ९८,३७४ रुपयांवर पोहोचली. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी लोकसभेत या संदर्भात माहिती दिली.
३१ मे २०२३ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०१२-१३ मध्ये देशाचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ७२,८०५ रुपये इतके होते. त्यानंतर गत आठ वर्षांमध्ये त्यात सुमारे ३५.१२% वाढ होत ती ९८,३७४ रुपये झाली. तसेच सरकारने नागरिकांचे दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सिंह यांनी उत्तरात सांगितले.