नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा व हिंदुस्थान पॉवर प्रॉजेक्टस (एचपीपी) या कंपनीचा अध्यक्ष रतूल पुरी यांचे २५४ कोटी रुपयांचे बेनामी समभाग प्राप्तीकर खात्याने जप्त केले आहेत. अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात बनावट कंपन्यांमार्फत हे समभाग त्यांना मिळाले होते, असा प्राप्तीकर खात्याला संशय आहे.
करचुकवेगिरी व मनी लाँडरिंगच्या प्रकरणांत त्याची अंमलबजावणी संचालनालयाकडूनही चौकशी सुरू आहे. रतूल पुरी यांचे वडील दिपक पुरी यांच्या मोजर बेअर या कंपनीशी संबंधित असलेल्या आॅप्टिमा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही रक्कम थेट परकीय गुंतवणूक म्हणून वळती करण्यात आली होती. हा सगळा व्यवहार अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ््यातील एक आरोपी व दुबईतील उद्योजक राजीव सक्सेना यांच्य्या बनावट कंपन्यांमार्फत पार पडला.
एचइपीसीएलकडून सोलार पॅनेल आयात केल्याचे दाखवून हा व्यवहार पार पाडण्यात आला. राजीव सक्सेनाचे दुबईतून भारतात गेल्या जानेवारीमध्ये प्रत्यार्पण करण्यात आले होते. या घोटाळ््याबाबत आता रतूल पुरीची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत आहे. रतूल पुरीला मिळालेला बेनामी पैसा त्याच्या वतीने राजीव सक्सेनाने मॉरिशसमधील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून स्वीकारला होता. आॅप्टिमा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आलेली २५४ कोटी रुपयांची रक्कम तत्काळ यूनोकॉन इन्फ्राडेव्हलपर या कंपनीमध्ये वळविण्यात आली.एचपीपीने चुकवला १३५० कोटींचा करबेनामी व्यवहाराद्वारे युनोकॉन इन्फ्राडेव्हलपर या कंपनीत झालेली गुंतवणूकही प्राप्तीकर खात्याने जप्त केली आहे. याबाबतचा गुन्हा सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीस काही वर्षांचा कारावास, जप्त केलेल्या मालमत्तेच्या बाजारभावापेक्षा २५ टक्के दंड आकारण्यात येऊ शकतो.रतूल पुरी, दीपक पुरी यांच्या घर, कार्यालयावर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्या होत्या. रतूल पुरीच्या एचपीपी या कंपनीने १३५० कोटींचा कर चुकवला आहे, असे तपासयंत्रणांना आढळून आले आहे.