Income Tax Raid : ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाचे सर्वेक्षण तीन दिवसांनंतर पूर्ण झाले. यानंतर या कारवाईबाबत आयकर विभागाने खुलासा केला असून, अधिकृत निवेदनही समोर आले आहे. आयकर कायदा, 1961 (अधिनियम) च्या कलम 133A अंतर्गत एक सर्वेक्षण ऑपरेशन बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये करण्यात आल्याचे आयकर विभागाने सांगितले.
बीबीसीच्या कार्यालयातून काय सापडले?आयकर विभागाने असेही सांगितले की, सर्वेक्षणादरम्यान बीबीसी ग्रुपने कमी उत्पन्न दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने म्हटले की, सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, विविध भारतीय भाषांमध्ये (इंग्रजी व्यतिरिक्त) कंटेटचा पुरेसा वापर असूनही, समूहाने दाखवलेले उत्पन्न किंवा नफा कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे.
कर्मचार्यांची विधाने, डिजिटल पुराव्यावर आधारित खुलासेसर्वेक्षणादरम्यान बीबीसीच्या ऑपरेशनशी संबंधित विभागाने गोळा केलेले पुरावे हे स्पष्टपणे दर्शवतात की, बीबीसीच्या परदेशी युनिट्सद्वारे नफ्याचे अनेक स्त्रोत होते, ज्यावर भारतातील कर भरला गेला नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, परदेशात आणि देशात असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांचे पेमेंट भारतीय युनिटने केले होते आणि त्यावर कर भरला नाही. बीबीसी कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट, डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे ही सर्व आर्थिक अनियमितता उघड झाली आहे.