नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास खर्चाच्या किमान दीडपट भाव देण्याचे सूत्र कायम ठेवून केंद्र सरकारने सन २०१९-२० या हंगामातील सर्व प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने यास मंजुरी दिली. याचा देशभरातील ८६ टक्के अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा दावा आहे. बाजार भाव या किमान आधारभूत भावापेक्षा खाली गेले तर सरकारने या भावाने शेतमाल खरेदी करायचा, अशी ही योजना आहे. अन्न महामंडळ व इतर संस्था तृणधान्यांची, नाफेड कडधान्यांची व कापूस महामंडळ व नाफेड कपाशीची.शेतमाल आधारभूत किमतींना खरेदी करण्यात या संस्थांना जो तोटा होईल, त्याची भरपाई केंद्र सरकार करेल. आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे.आधारभूत किंमतीतील वाढभात (धान) (सामान्य) ६५भात (धान) ( ए ग्रेड) ६५ज्वारी (हायब्रीड) १२०ज्वारी (मालदांडी) १२०बाजरी ५०नाचणी २५३मका ६०तूर १२५मूग ७५उडीद १००भूईमुग २००सूर्यफूल २००सूर्यफूल(पिवळे)३११तीळ २३६जवस६३कपाशी (लांब)१०५कपाशी (मध्यम)१००(प्रति क्विंटल रुपयांत)
सर्व प्रमुख खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ; आर्थिक बाबींबिषयक समितीची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 5:25 AM