शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

पंतप्रधान मोदींचं उत्पन्न वाढता वाढता वाढे; जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 4:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

लखनौ - पंतप्रधाननरेंद्र मोदींनीवाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये, मोदींच्या एकूण संपत्तीचे विवरण करण्यात आले आहे. मोदींकडे एकूण 2.5 कोटी रुपयांची संपत्ती असून राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमध्ये असलेल्या ठेवीवरील व्याजातूनच मोदींना पैसा मिळतो. या व्यतिरिक्त मोदींना उत्पन्नाचे दुसरे  कुठलेही साधन नाही. 

पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाराणसीचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी अन्नपूर्णा शुक्ला यांचे चरण स्पर्श केले. अन्नपूर्णा देवींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला. मोदींनी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीचे विवरण करण्यात आले आहे. मोदींच्या नावावर एक घर असून एकही गाडी त्यांच्याकडे नाही. तसेच, मोदींच्या नावावर जमिनीचा एक तुकडाही नाही, म्हणजे मोदींना शेती नाही. 

मोदींचे उत्पन्न गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यंदा दुप्पट झाल्याचे दिसून येते. मोदींचे सन 2013-14 साली उत्पन्न 9 लाख 69 हजार 711 रुपये होते. तर, 2018-19 या वर्षभरातील उत्पन्न 19 लाख 92 हजार 520 रुपये एवढे आहे. सन 2014 पासून मोदींच्या संपत्तीत दरवर्षी वाढ झाली आहे. पण, 2016-17 मध्ये मोदींच्या संपत्तीत 2015-16 पेक्षा घट झाल्याचे दिसून येते. जवळपास 4 लाख 70 हजार रुपयांची ही घट दिसत आहे. त्यानंतर, 2018-19 मध्ये मोदींचे वार्षिक उत्पन्न जवळपास 20 लाख रुपये आहे. 

2013-14 : 9 लाख 69 हजार 711 रुपये2014-15 : 8 लाख 58 हजार 780 रुपये2015-16 : 19 लाख 23 हजार 160 रुपये2016-17 : 14 लाख 59 हजार 750 रुपये2017-18 : 19 लाख 92 हजार 520 रुपये 

मोदींनी प्रतिज्ञापत्रात पत्नी जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांचा पॅन कार्ड नंबर आणि उत्पन्नाबाबत ‘माहित नाही’ असा उल्लेख आहे. तसेच, पत्नीच्या शिक्षण, व्यवसाय, संपत्ती इत्यादीबाबतही ‘माहित नाही’ असाच उल्लेख शपथपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी वाराणसीमध्ये भव्य रोडशो केला. या रोड शोला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर, मोदींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. 

जंगम मालमत्तेचं विवरण :रोख रक्कम – 38 हजार 750 रुपयेबँकेतील ठेवी – 1 कोटी 27 लाख 85 हजार 717 रुपयेगुंतवणूक – 20 हजार रुपये (एल अँड टीचे बाँड)गुंतवणूक –7 लाख 61 हजार 466 रुपये (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट)गुंतवणूक –1 लाख 90 हजार 347 रुपये (एलआयसी)दागिने – 45 ग्रॅमच्या सोन्याच्या 4 अंगठ्या (किंमत – 1 लाख 13 हजार 800 रुपये)इतर – 85 हजार 145 रुपये (टीडीएस) आणि 1 लाख 40 हजार 895 रुपये (पीएमओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिक्षणएसएससी (1967) – एसएससी बोर्ड, गुजरातबीए (1978) – दिल्ली यूनिव्हर्सिटी, दिल्लीएमए (1983) – गुजरात यूनिव्हर्सिटी, अहमदाबाद 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानvaranasi-pcवाराणसीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक