नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा वेग घेताना दिसत आहे. मंगळवारी चार महिन्यांनंतर सर्वात कमी 31,443 नवे रुग्ण आढळले होते. मात्र, यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या रुग्णवाढीला तिसऱ्या लाटेशी जोडून पाहिले जात आहे.
देशात गुरुवारी गेल्या 24 तासांत 41,854 नवे कोरोना बाधित आढळले, तर 580 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी देशात 38,792 नवे कोरोनना बाधित रुग्ण समोर आले होते, तर 624 जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता.
महाराषट्रात 93 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यांत -मागील एक महिना 7 ते 8 हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढत आहेत. राज्यातील 93 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यांत आहेत. उर्वरित 26 जिल्ह्यांमध्ये केवळ ८ टक्के रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, नगर, रायगड येथील रुग्णसंख्या वाढत आहे.
महाराष्ट्रात तूर्त कायम राहणार निर्बंध -कोरोना रुग्णवाढीचा वेग देशाच्या तुलनेत कमी असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका पाहता निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नाही. दुकाने, रेस्टॉरंटंची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
CoronaVirus News: कोरोना संकटात सर्वासामान्यांना मोठा दिलासा; पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटरचे दर घटणार
जगात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ - जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी कोरोना परिस्थितीसंदर्भातील साप्ताहिक अहवाल जारी केला. यात 5 जुलै ते 11 जुलै या कालावधीत जगभरात 30 लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही 11 टक्के रुग्णवाढ ठरली आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या आठवड्यात 55 हजाराहून अधिक जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. मृत्यूंच्या संख्येत 3 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
ब्राझील आणि भारतात सर्वाधिक रुग्ण -5 जुलै ते 11 जुलै दरम्यान जगभरात सर्वाधिक रुग्ण ब्राझील आणि भारतात आढळून आले आहेत. यात ब्राझीलमध्ये गेल्या आठवड्यात ३.३३ लाखांहून अधिक, तर भारतात २.९१ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतासाठी दिलासादायक बाब अशी, की नव्या रुग्णवाढीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ७ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. ब्राझील आणि भारतानंतर इंडिनेशियात रुग्ण संख्येत तिसऱ्या स्थानावर आहे. इंडोनेशियात 2.43 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे इंडोनेशियाचा हा आकडा गेल्या आठवड्यापेक्षा तब्बल 44 टक्क्यांनी अधिक नोंदवला गेला आहे.