नवी दिल्ली : वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली़ सरकारने नसरीन यांना एक वर्षाचा व्हिसा देण्यास नकार देत केवळ दोन महिन्यांर्पयत भारतात राहण्याची परवानगी दिली आह़े या पाश्र्वभूमीवर ही भेट झाल्याचे कळत़े
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2क् मिनिटांच्या या भेटीत नसरीन यांनी गृहमंत्र्यांना अधिक काळ भारतात राहण्याची परवानगी देण्याची गळ घातली़ बैठकीनंतर खुद्द नसरीन यांनी टि¦टरवरून याची माहिती दिली़ मी गृहमंत्र्यांना भेटल़े त्यांना ‘वो अंधेरे दिन’ पुस्तक भेट दिल़े ‘आपके अंधेरे दिन खत्म हो जाएंगे’ असे गृहमंत्री यावेळी मला म्हणाले, असे टि¦ट त्यांनी केल़े
1993 मध्ये तस्लिमांची ‘लज्ज’ नामक कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर बांगलादेशात प्रचंड वादळ उठले होत़े मुस्लीम कट्टरवादी समूहांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बांगलादेश सरकारने पासपोर्ट जप्त केल्यानंतर त्यांना देशातून परागंदा व्हावे लागल़े यानंतर त्यांना स्वीडनचे नागरिकत्व मिळाल़े दहा वर्षे त्यांनी अमेरिका आणि युरोपात राहून लेखन केल़े भारताचा व्हिसा मिळाल्यानंतर त्यांनी कोलकात्यात वास्तव्य केल़े तथापि 2क्क्7 मध्ये हैदराबाद येथे पुस्तक प्रकाशनावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता़ पाठोपाठ कोलकात्यात हिंसक निदर्शने झाली होती़ 2क्क्8 मध्ये नवी दिल्लीत त्यांना तब्बल सहा महिने नजरकैदेत ठेवण्यात आले होत़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्सरकारने तस्लिमा यांच्या व्हिसा अर्जाच्या छाननीची प्रक्रिया सुरू केली आह़े तसेच त्यांच्या दीर्घ अवधीच्या व्हिसा अर्जावरील निर्णय राखून ठेवत त्यांना केवळ दोन महिन्यांचा व्हिसा दिला आह़े
च्गृहमंत्रलयाच्या एका अधिका:याने सांगितले की, छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल़