नवी दिल्ली : विविध न्यायालयांतील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत असताना सर्वोच्च व उच्च न्यायालयांत रिक्त न्यायाधीशपदांची संख्याही वाढत चालली आहे. ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विविध न्यायालयांत १ सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या २.२८ कोटी झाली आहे. १२ आॅगस्ट रोजी ही संख्या २.२४ कोटी होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)सर्वोच्च न्यायालयात तीन पदे रिक्त...
उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या रिक्त पदांची संख्याही ४८५ झाली आहे. १ आॅगस्ट रोजी ती ४७८ होती. इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयातील तीन पदेही रिक्त आहेत.