शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

टंचाईग्रस्त गावे व टँकरचीही संख्या वाढू लागली तीन टँकर वाढले : २६ गावांना १८ टँकरने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरी वाढल्या

By admin | Published: March 05, 2016 11:49 PM

जळगाव : जिल्‘ात टंचाईच्या झळा तीव्र होत असून टंचाईग्रस्त गावे व टँकरचीसोबतच विहीर अधिग्रहन, विंधन विहिरींची संख्या वाढत आहे.

जळगाव : जिल्‘ात टंचाईच्या झळा तीव्र होत असून टंचाईग्रस्त गावे व टँकरचीसोबतच विहीर अधिग्रहन, विंधन विहिरींची संख्या वाढत आहे.
अत्यल्प पावसामुळे जिल्‘ात डिसेंबर महिन्यापासून टंचाईची स्थिती भासत आहे. जिल्‘ातील २३ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. त्यात जळगाव तालुक्यात एक, जामनेर तालुक्यातील आठ गावांत, चाळीसगाव तालुक्यात एक, अमळनेर तालुक्यात पाच गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील आठ गावांचा समावेश होता. शासकीय दहा व खाजगी पाच टँकरच्या मदतीने हा पाणीपुरवठा होत होता. यामध्ये पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा व भडगाव तालुक्यातील वडगाव बुद्रुक या दोन गावांमध्ये टँकरसाठीचा प्रस्ताव आला आहे. त्यानुसार या दोन्ही गावांसह चाळीसगाव तालुक्यातही एका टँकरला मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे आता २६ गावांमध्ये १८ टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. यात शासकीय १० तर खाजगी आठ टँकरचा समावेश आहे.

विंधन विहिरींचीही संख्या वाढली...
जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे बोदवड तालुक्यातील चिखली, शेवगे, मनूर बुद्रुक, मनूर खुर्द, बोरगाव, लोणवाडी तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद, धानवड, धानवड तांडा, बिलवाडी, वसंतवाडी, सुरेशदादा जैन नगर, शिरसोली प्र.न., शिरसोली प्र.बो. यासह २२ गावांमधून प्रस्ताव होते. २ मार्च पर्यंत जिल्‘ातील १५८ गावांमधील ३५८ नवीन विंधन विहीर घेण्यात आल्या होत्या. त्यात आणखी भर पडली आहे. आता १८३ गावांमध्ये ४२० विंधन विहीर घेण्यात आल्या आहेत.

विहीर अधिग्रहणही वाढले...
जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी आतापर्यंत विहीर अधिग्रहण केलेल्या गावांची संख्या आता ९९ वरुन १३८ झाली आहे. त्यात जामनेर तालुक्यातील सात विहिंरीची भर पडून हा आकडा नऊवरुन १६ वर गेला आहे. धरणगाव तालुक्यातील २२ गावांमधील २३, एरंडोल तालुक्यातील नऊ (दोनने वाढ), भुसावळ तालुक्यातील सात गावांमधील सात (चारने वाढ), बोदवड तालुक्यातील पाच गावांमधील, पाचोरा तालुक्यातील १० (सहाने वाढ), चाळीसगाव तालुक्यातील सहा (तीनने वाढ), भडगाव तालुक्यातील सात (चारने वाढ), अमळनेर तालुक्यातील ३५ गावांमधील ३३ विहिरी, पारोळा तालुक्यातील १५ (१०ने वाढ) गावांतील विहिर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्याचीही भर पडून तालुक्यातील चार गावात विहीर अधिग्रहित केल्या आहेत.