लोकमत न्यूज नेटवर्कडेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत दोन तृतीयांश जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा मानही पटकावला. ७० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची कामगिरी किंचित सुधारली.
राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा खटिमा मतदारसंघात काँग्रेसचे भुवन चंद्र कापरी यांनी ६ हजार ५७९ मतांनी पराभव केला. वार्ताहरांशी बोलताना धामी म्हणाले, ‘व्हीजन डाॅक्युमेंटमध्ये आम्ही जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली. अतिशय मोठे यश दिल्याबद्दल मतदारांचे आभार.’ समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या स्वत:च दिलेल्या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
भाजपने ७० सदस्यांच्या विधानसभेत ३१ जागा जिंकून १६ मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे तर काँग्रेसने १३ जागा जिंकून ६ जागांवर आघाडी घेतली आहे. २०१७ मधील निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकल्या होत्या. सर्व ७० जागा लढवलेल्या आम आदमी पक्षाला राज्यात एकही यश मिळालेले नाही. २०१७ च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला एकही जागा नव्हती. यावेळी त्याने एक जागा जिंकली असून, दुसरा उमेदवार पुढे आहे.धामी पराभूत झाल्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण असेल, हा सध्या प्रश्न आहे. पुष्कर धामी यांना पुन्हा संधी दिली जाण्यावर कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, ‘या प्रश्नाचे उत्तर आता कोणी देऊ शकत नाही. हा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळ घेईल.’ भाजपचे चंपावत मतदारसंघातील विजयी उमेदवार कैलाश गाहातोडी यांनी धामी यांच्यासाठी आमदारकी सोडण्याची तयारी दाखवली आहे.
यशाचे श्रेय मोदींनाउत्तराखंडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधातील जनमतामुळे वर्ष २००० पासूनएकाच पक्षाला सलग दुसऱ्यांदासंधी मिळाली नव्हती. भाजपने मतदारांवर राष्ट्रहित, राष्ट्राची सुरक्षा, लष्करी कल्याण आणि धार्मिक पर्यटन आदी मुद्द्यांवरून प्रभाव पाडला, हे मतदानातून दिसले. भाजपच्या या यशाचे श्रेय राजकीय निरीक्षक नरेंद्र मोदी या घटकाला सगळ्यात आधी देतात.