काँग्रेसचे विद्यमान आमदार बी नारायण राव यांचं कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 05:04 PM2020-09-24T17:04:40+5:302020-09-24T17:05:21+5:30
नारायण रावे हे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते.
बंगळुरू - कोरोनामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे विद्यमान आमदार बी नारायण राव यांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी 3.55 वाजता नारायण राव यांनी अखेरचा श्वास घेतला. 1 सप्टेंबर रोजी त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हापासून त्यांच्यावर कोविड 19 चे उपचार सुरू होते. रुग्णालयात असतानाच आज त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यांच्या शरीरातील काही भाग निर्जीव झाले होते, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिष राय यांनी सांगितले .
नारायण रावे हे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. नारायण राव यांच्या निधनाने राज्यातील काँग्रेसमध्ये शोककळा पसरली असून कोरोनाला गंभीरतेने घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे.
Narayan Rao, MLA from Basavakalyan constituency in Bidar District passed away at 3.55 pm today. He was admitted to Manipal Hospital on 1st September. He was diagnosed with severe COVID-19 infection: Manipal Hospitals#Karnataka
— ANI (@ANI) September 24, 2020