India vs Sri Lanka 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना केरळच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर होत आहे. सामन्यासाठी शुक्रवारीच भारतीय संघ केरळच्या तिरुअनंतपुरम (Trivandrum) येथे पोहोचला होता. दरम्यान, सामन्यापूर्वी टीम इंडियातील खेळाडूंनी येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराला (Padmanabhaswamy temple) भेट दिली. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रीलंकेविरुद्ध तिरुअनंतपुरममध्ये तिसरा वनडे सुरू आहे. यापूर्वी शनिवारी भारतीय संघातील काही खेळाडूंनी येथील जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी (Team India in Padmanabhaswamy Temple) मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी संघातील काही खेळाडू आणि BCCIचे काही अधिकारी उपस्थित होते. खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर होते.
मंदिराच्या मुख्य द्वारावर या खेळाडूंनी एक फोटोही काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये भारतीय खेळाडू पांढऱ्या लुंगीमध्ये दिसत आहेत. या फोटोमध्ये चहल, यादव पुढे तर इतर खेळाडून पाठीमागे उभे असल्याचे दिसत आहेत. तसेच, यावेळी मंदिरातील पुजारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने हा फोटो शेअर केला आहे.