नवी दिल्ली - देशातील कोरोना संसर्गाचा धोका चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने सरकार आणि प्रशासनाला सध्या सर्व लक्ष कोरोनाविरोधातील लढाईकडे लागलेले आहे. मात्र अशा परिस्थितीतही शनिवारी होणाऱ्या देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी आता पूर्ण होत आली आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन भारतातस्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. दरम्यान, यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास ठरणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सांभाळल्यापासून सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. त्याबरोबरच लाल किल्ल्यावर सर्वाधिकवेळा तिरंगा फडकवणारे ते देशाचे चौथे पंतप्रधान ठरतील. तसेच लाल किल्ल्यावर सर्वाधिक सात वेळा ध्वजवंदन करणारे ते पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरतील.लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावे आहे. त्यांनी त्यांनी १९४७ ते १९६३ या काळात एकूण १७ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता. तर या क्रमावारीत इंदिरा गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत इंदिजा गांधींनी १९६६ ते १९७७ आणि १९८० ते १९८४ या काळात एकूण १६ वेळा तिरंगा फडकवण्याचा मान मिळवला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान १० वेळा मिळवला.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सलग सहा वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता. वाजपेयी हे आतापर्यंत सर्वाधिकवेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणारे बिगरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. आता त्यांचा हा रेकॉर्ड मोदी मोडीत काढतील. वाजपेंयींशिवाय एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांनी प्रत्येकी एक वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. तर व्ही.पी सिंह यांनाही एकदा लाल किल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला.याशिवाय राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या्ंना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान प्रत्येकी दोन वेळा मिळाला. तर लालबहादूर शास्त्री यांनी दोन वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. मोरारदी देसाई यांना दोन वेळा तर चौधरी चरण सिंह यांना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान एक वेळ मिळाला. मात्र गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर या पंतप्रधानांना मात्र लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी