नवी दिल्ली – १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदा भारत ७५ व्या स्वातंत्र्यदिनी अमृत दिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहित्येत १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी भारतात काय काय झालं? यातील अनेक असे किस्से आहेत जे अनेकांना माहिती नसतील. यात भारत-पाकिस्तान फाळणी, सीमा मोजणी, दंगल आणि माउंटबेटन योजना आणि राजघराणे भारतात विलीन करण्याचा मुख्य समावेश होता.
१९४६ मध्ये ब्रिटनच्या लेबर पार्टी सरकारचा आर्थिक खजिना दुसऱ्या महायुद्धानंतर रिकामा झाला होता. तेव्हा ना घरात लोकांचे समर्थन होतं ना आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन याची जाणीव ब्रिटनला झाली. त्यामुळे ब्रिटन अस्वस्थ झाला होता. त्यामुळे भारतावर नियंत्रण करण्यासाठी असणाऱ्या देशी दलांचा विश्वास उडत चालला होता. फेब्रुवारी १९४७ पंतप्रधान क्लीमेंट एटली यांनी घोषणा केली की, ब्रिटीश सरकार जून १९४८ पासून भारताला पूर्णपणे स्व-अधिकार देईल. त्यानंतर वायसराय लॉर्ड माउंटबेटनने सत्ता हस्तांतरण करण्याची तारीख पुढे ढकलली.
माउंटबेटनला वाटत होतं की, काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे सरकार कोसळू शकतं. सत्ता हस्तातरणाची तारीख दुसऱ्या विश्वयुद्धात जपानने आत्मसमर्पण केल्याला दोन वर्ष झाल्यानं १५ ऑगस्ट निवडली होती. ब्रिटीश सरकारने ब्रिटीश भारताला दोन राज्यात विभाजन करण्याचा विचार ३ जून १९४७ मध्ये स्वीकारला. तसेच दोन्ही सरकारला स्वतंत्र्य अधिकार दिले जातील. त्यांना ब्रिटीश कॉमनवेल्थपासून वेगळे होण्याचा अधिकार येतील अशी घोषणा केली.
स्वातंत्र्यापूर्वीचे ६० दिवस
ब्रिटीश सरकारने ३ जून १९४७ ला भारताच्या विभाजाचा निर्णय घेतला. भारताच्या विभाजनाची योजना माउंटबेटन योजना म्हणून ओळखली जाते. भारत-पाकिस्तानची सीमा रेषा ठरली. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटीश संसदेत भारताला स्वतंत्रता देणारा कायदा पारित झाला. त्यानंतर ५६५ मधील ५५२ राजघराणी स्वच्छेने भारतात समाविष्ट झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्टला वेगळं पाकिस्तान बनवलं.
विभाजनावेळी बंगाल, बिहार आणि पंजाबमध्ये दंगल झाली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यता दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. दंगली रोखण्यासाठी महात्मा गांधी १५ ऑगस्टला बंगालच्या नोआखलीमध्ये उपोषण करत होते. (Happy independence day 2021) लाखो मुस्लीम, सिख आणि हिंदू शरणार्थी स्वातंत्र्यानंतर नवीन सीमेतून पायी प्रवास करत होते. पंजाब ज्याठिकाणी सीमेमुळे दोन प्रांत वेगळे झाले. तिथे मोठा हिंसाचार घडला. रक्तपात झाला. बंगाल, बिहार येथे हिंसक आंदोलनं झाली. नवीन सीमेमुळे दोन्ही देशांचे २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
१४ ऑगस्टला संविधान सभेची बैठक होती. या बैठकीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेच्या बैठकीनंतर भारत स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली. या बैठकीत जवाहर लाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करत ट्रिस्ट विद डेस्टिनी नावाचं भाषण केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचं कोणतंही राष्ट्रगीत नव्हतं. रवींद्रनाथ टागोरांनी जन गण मन १९५० मध्ये लिहिलं होतं.