Sonia Gandhi : "मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"; सोनिया गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 01:39 PM2022-08-15T13:39:01+5:302022-08-15T13:45:33+5:30

Congress Sonia Gandhi And Modi Government : देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे.

Independence Day 2022 Congress Sonia Gandhi attack on modi govt | Sonia Gandhi : "मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"; सोनिया गांधींचं टीकास्त्र

Sonia Gandhi : "मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"; सोनिया गांधींचं टीकास्त्र

googlenewsNext

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day 2022) शुभेच्छा दिल्या आहेत. याच दरम्यान त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "केंद्रातील मोदी सरकार आत्ममग्न सरकार आहे. गांधी, नेहरू आणि पटेल आणि स्वातंत्र्याबाबत खोटा इतिहास सांगितला जात आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि गौरवशाली यशाला तुच्छ लेखण्याचं काम करत आहे" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे. "गेल्या 75 वर्षात प्रतिभावंत भारतीयांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर आपण विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि सूचना प्रसारण आदी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक भारतीयांच्या कष्टामुळेच हे साध्य झालं असून म्हणूनच आपण विकासात मोठी झेप घेतली आहे."

"गेल्या 75 वर्षात अनेक मोठी उद्दिष्टे गाठली आहेत. मात्र, हे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि गौरवशाली यशाला तुच्छ लेखण्याचं काम करत आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही" असं म्हणत सोनिया गांधी यांनी निशाणा साधला आहे. राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक गोष्टींची मोडतोड केली जात आहे. गांधी, नेहरू आणि पटेल आणि स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही हे प्रयत्न मोडून काढू."

"आम्ही त्याचा जोरदार विरोध करू. आपल्या दूरदृष्टी नेत्यांमुळेच आपण एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक व्यवस्था स्थापित केली आहे. तसेच लोकशाही आणि संवैधानिक संस्थांनाही मजबूत केलं आहे. भाषा, धर्म, सांप्रदायिकता आणि विविधता असूनही भारताने एक अग्रणी देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे" असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Independence Day 2022 Congress Sonia Gandhi attack on modi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.