गेल्या काही आठवड्यांत इशान्य भारतात विशेषतः मणिपूरमध्ये आणि भारताच्या इतरही काही भागांत, मात्र प्रामुख्याने मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानासोबत जो प्रकार घडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहे. देश मणिपूरच्या नागरिकांसोबत आहे. मणीपूरने गेल्या काही दिवसांत जी शांतता राखली आहे. तशीच राखावी, कारण यातूनच समाधानाचा मार्ग निघेल. यासाठी सरकारही योग्य ते प्रयत्न करत आहे आणि करत राहील, असा विश्वासपंतप्रधान मोदी यांनी आज मणिपूरच्या नागरिकांना दिला. ते ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून सलग १० व्यांदा तिरंगा ध्वज फडकावल्या नंतर, उपस्थित नागरिकांना संबोधित करत होते.
यावेळी देशाच्या अनेक भागांत नेसर्गित आपत्ती आली. ज्यांना यांचा सामना करावा लागला. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार एकत्रीत पणे या संकटातून बेहेर पडण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपण पुन्हा एकदा विकासाच्या मार्गाने पुढे जाऊ.
घटना छोटी असली तरी ती नंतर समस्या बनते... -मोदी म्हणाले, "आपण जेव्हा इतिहासावर दृष्टी टाकतो, तेव्हा इतिहासात काही प्रसंग असे येतात, जे आपली कधीही न पुसली जाणारी छाप सोडून जातात आणि त्याचा परिणाम वर्षानू वर्षे राहतो. कधी कधी ती फार छोटीशी घटना वाटते. मात्र ती नंतर अनेक समस्यांचे मूळ बनते. हजार बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले. एका छोट्याशा राजाचा पराभव झाला. मात्र, तेव्हा माहीतही नव्हते, की एक घटना भारताला हज वर्षाच्या गुलामीत अडकवेल आणि आपण गुलामीत अडक केलो. जे आले ते लुटत गेले, ज्याला वाटले, आले आणि आपल्यावर येऊन स्वार झाले. बंधूंनो घटना छोटी का असेना. पण तीने हजार वर्षे प्रभाव सोडला."
"मी आज याचा उल्लेख यासठी करत आहे, की भारताच्या वीरांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबरदस्त संघर्ष केला. बलिदान दिले. मा भारती बेड्यांमधून मुक्त होण्यासाठी उभी राहिली होती आणि देशातील नारी शक्ती, देशातील युवा शक्ती, देशातील शेतकरी, मजदूर, असे अनेक लोक देशासाठी उभे राहिले. अनेक जण बलिदानासाठी तयार झाले होते. एक फौजच तयार झाली होती. हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते," असे मोदी म्हणाले.
या काळात घडणाऱ्या घटना येणाऱ्या एक हजार वर्षांसाठी आपला प्रभाव सोडणार -मोदी म्हणाले, "मी हजार वर्षांपूर्वीची गोष्ट यासाठी करत आहे, कारण मी बघत आहे, की देशासमोर पुन्हा एकदा संधी आली आहे. आपण भारताच्या या अमृत कालखंडात प्रवेश केला आहे, ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या कालखंडात आपण जे काही करू, जी पावले उचलू, त्याग करू, निर्णय घेऊ, येणाऱ्या एक हजार वर्षांचा देशाचा स्वर्णिम इतिहास यातून अंकुरीत होणार आहे. या काळात घडणाऱ्या घटना येणाऱ्या एक हजार वर्षांसाठी आपला प्रभाव सोडणार आहे."
माझी भारत माता आज पुन्हा एकदा जागृत झाली आहे -"गुलामीच्या माणसिकतेतून बाहेर पडलेला हा देश आज नव्या आत्मविश्वासाने आणि संकल्पाने पुढे वाटचाल करत आहे. माझी भारत माता जी कधीकाळी उर्जेचे सामर्थ्य होती. ती आज पुन्हा एकदा जागृत झाली आहे. भारताच्या सामर्थ्याप्रती एक नवी आशा निर्माण झाली आहे. जगात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे," असेही मोदी म्हणाले.