शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

Independence Day Updates : '‘तिहेरी तलाकविरोधात आम्ही तो कायदा करणारच'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 7:10 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशाला संबोधित करणार आहेत.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशाला संबोधित केलं. लाल किल्यावरून मोदींनी ध्वजारोहण केलं असून, देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देश नव्या उंची गाठतो आहे. आजचा सूर्योदय नवी उमंग, उत्साहाला घेऊन आला आहे, असं मोदी म्हणाले आहेत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय आहे. 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकावेल, अशा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. 

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाआधी कवायत करण्यात आली असून, लोकांनी मोठी गर्दी केली आहे. लाल किल्ल्यावरूनच मोदी पाचवं आणि शेवटचं भाषण केलं आहे. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत. लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी Live Updates- न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरुच्चार - तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काही जण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच- देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती, आमच्या कॅबिनेटमध्येही महिलांना सर्वाधिक स्थान- 2013 पर्यंत 4 कोटी नागरिक टॅक्स भरत होते, आता ती संख्या पावणे सात कोटीवर पोहोचली आहे. आज देश इमानदारीचा उत्सव साजरा करत आहे. आम्ही 'भाई-भतीजा'वाद संपवला- कुणाचं पोट भरल्यानंतर मिळणारं पुण्य मोठं असतं, हे पुण्य देशातील प्रामाणिक करदाते कमावत आहेत- 25 सप्टेंबरपासून पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करणार. देशातल्या 10 कोटी कुटुंबांना(50 कोटी नागरिकांना)वार्षिक पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा. सामान्य नागरिकांना गंभीर मेडिकल उपचारांची चिंता जाणवणार नाही- येत्या 25 सप्टेंबरला पं. दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करणार, 10 कोटी कुटुंबांना (50 कोटी लोक) 5 लाखांचा विमा - एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातले पाच कोटी लोक गेल्या दोन वर्षांत दारिद्र्यरेषेतून वर आलेत- प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य - आयुषमान योजनेचा 10 कोटी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे. - 25 सप्टेंबरपासून जन आरोग्य अभिनयाला सुरुवात करणार- ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय - 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल - खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला - 13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतलं, हा बदललेल्या हिंदुस्थानाचा पुरावा आहे- आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला- आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे- 2013 च्या वेगानं देशात सर्वत्र शौचालयं पोहोचवायला एक शतक लागलं असतं, सर्व गावात वीज पोहचवायला आणखी दोन दशके लागली असती.- गावागावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी जो वेग 2013 मध्ये होता, तोच वेग जर कायम ठेवला असता, तर त्या कामासाठी अनेक पिढ्या गेल्या असत्या. – आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे - 2013 मध्ये गॅस कनेक्शनसाठी जो वेग होता, तोच कायम ठेवला असता, तर प्रत्येक घरात गॅस पोहोचण्यासाठी अनेक वर्ष गेली असती- महान तमीळ कवी सुब्रमणियम भारतींनी लिहिलं होते, भारतानं महान राष्ट्राच्या रूपानं उंची गाठून तो इतर देशांनाही प्रेरणा देईल.- बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. - गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकानं स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षेनुसार प्रगती करावी. - 2014पासून अनुभवलं आहे की, देशातील सव्वाशे कोटी जनतेनं फक्त सरकार बनवलं नाही, तर ते देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.- आपल्या देशात 12 वर्षांतून एकदा तरी निलकुरिंजी हे फूल फुलतं- देशात आज आत्मविश्वास आहे. - देशात नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे.- संसदेचं अधिवेशन आदिवासींना समर्पित होतं- ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा बहाल करण्यात आला आहे- परिश्रम आणि पराकाष्ठेमुळे देश नवनव्या उंची गाठत आहे- आदिवासी मुला-मुलींनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला- लष्कर देशाच्या सेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असतं- देशाच्या मुलींनी सात समुद्र पार केले - आदिवासी तरुणांनी तिरंग्याची शान वाढवली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लाल किल्ल्यावर उपस्थितपंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले, थोड्याच वेळात देशाला करणार संबोधित- नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळाला केलं अभिवादन

टॅग्स :Red Fortलाल किल्लाdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिवस