नवी दिल्ली-
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन संबोधित केलं. मोदींनी आपल्या १ तास २३ मिनिटांच्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मोदींनी यावेळी आपलं सर्वात मोठं टेन्शन कोणतं हेही सांगितलं. देशातील महिलांचा अपमान होणाऱ्या घटना बंद व्हायला हव्यात असं मोदींनी म्हटलं.
'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'; नरेंद्र मोदींनी दिला नवा नारा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्यसाधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन नारी शक्तीच्या सन्मानावर अधिक भर दिला. "हम वो लोग हैं, जो जीव में शिव देखते हैं, हम वो लोग हैं, जो नगर में नारायण देखते हैं, हम वो लोग हैं, जो नारी को नारायणी कहते हैं, हम वो लोग हैं, जो पौधे में परमात्मा देखते हैं, हम वो लोग हैं, जो नदी को मां मानते हैं, हम वो लोग हैं, जो कंकड-कंकड में शंकर देखते हैं", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी महिलांचा अपमानापासून मुक्तीचा संकल्प आपण केला पाहिजे असंही म्हटलं.
देशाला लुटणाऱ्यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ; लाल किल्ल्यावरुन PM मोदींचा थेट इशारा
राष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महिलांचा अभिमान महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्त्रीचा अपमान करणे योग्य नाही. महिलांच्या सन्मानाचा देशाला अभिमान आहे. देशात महिलांचा सन्मान प्रत्येक परिस्थितीत आवश्यक आहे. आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्या पद्धतीने बनवले गेले आहे, ज्या पद्धतीने मंथन केले गेले आहे, ते लोकांच्या विचारांच्या प्रवाहाचे संकलन करून केले गेले आहे. भारताचे शैक्षणिक धोरण मातीशी निगडीत बनले आहे.
स्वावलंबी भारतीय समाजासाठी जनआंदोलनआज जग पर्यावरणाच्या समस्येला तोंड देत आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या सोडवण्याचा मार्ग आपल्याकडे आहे. यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा आहे. स्वावलंबी भारत, ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते. स्वावलंबी भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही. ही समाजाची जनआंदोलन आहे, जी आपल्याला पुढे न्यायची आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.