शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 09:25 IST

Independence Day 2020 : कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 24 लाखांवर पोहोचली आहे. तर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. याच दरम्यान पंतप्रधानांनी कोरोना लसी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.  

"कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडला आहे, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात असून प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार" असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशवासियांना संबोधित करताना देशातील संशोधक कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. संशोधकांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे असं मोदींनी म्हटलं आहे. 

"आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाईल. तुमची प्रत्येक चाचणी, आजार याची माहिती त्या आयडीमध्ये असेल" असं ही पंतप्रधानांनी सांगितलं. "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे असंही मोदींनी सांगितलं. जगाला भारताकडून उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. आम्ही आत्मनिर्भर बनलो तर जगाला काहीतरी देऊ शकतो. जगाला कच्चा माल देऊन आम्ही किती दिवस पक्का माल खरेदी करणार आहोत? एके काळी परदेशातून गहू आयात केले जात होते. आज शेतकऱ्यांनी गहू भारतातच उत्पादित केला. गरजा पूर्ण झाल्या आणि इतर देशांना तो पाठविला जातो. कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केला, असे मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत