पाणीपीची बिले मिळणार स्वतंत्र अमृत योजना : उत्पन्न खर्चाची अचूक माहिती मिळण्यासाठी कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2016 10:02 PM
जळगाव : मनपाचा अमृत योजनेत समावेश झाल्याने चोवीसतास पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्याअनुषंगाने पाणीपुरवठ्याच्या उत्पन्न व खर्चाची अचूक माहिती मिळावी यादृष्टीने बिले स्वतंत्रपणे दिली जाऊन त्याचा हिशेब स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. गुरूवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
जळगाव : मनपाचा अमृत योजनेत समावेश झाल्याने चोवीसतास पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्याअनुषंगाने पाणीपुरवठ्याच्या उत्पन्न व खर्चाची अचूक माहिती मिळावी यादृष्टीने बिले स्वतंत्रपणे दिली जाऊन त्याचा हिशेब स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. गुरूवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. पावती पुस्तके छापलेली असल्याने सुरूवातीला काही दिवस मालमत्ता कराच्या बिलातच पाणीपीच्या बिलाचा समावेश असेल. मात्र त्याची कीर्द वेगळे करण्यात आली आहे. तसेच पाणीपीच्या बिलाची पावती देखील वेगळी दिली जाणार आहे. सध्या मालमत्ता करातच पाणीपीचाही समावेश असल्याने पाणीपुरवठ्यावर होणार खर्च व पाणीपीचे मिळणारे उत्पन्न याची अचूक आकडेवारी उपलब्ध होत नाही. अमृत योजनेत मात्र चोवीस तास पाणीपुरवठा करावयाचा असल्याने याबाबतची अचूक माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ------ इन्फो-----आज मार्च क्लोजींगमनपाची वसुली सुरूच असल्याने बुधवारी मार्च क्लोज केला जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. त्यानंतर गुरूवारपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात केली जाणार असून त्यानुसार वसुली सुरू केली जाईल. एप्रिल महिन्यात घरपी भरणार्यांना १० टक्के सूट परवापासून लागू केली जाणार आहे.