हिमाचल प्रदेशातील मलाना हे दुर्गम आणि प्राचीन खेडे. हजारो वर्षांपासून त्याचा बाह्य जगाशी संबंध नाही. स्वत:ची भाषा व लोकशाही असे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचे प्रजासत्ताक ग्राम परिषदेमार्फत चालते. या ग्राम परिषदेची वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन सभागृहे आहेत. गावातील लोक एकमताने परिषद सदस्यांची निवड करतात. त्यांचे स्वत:चे न्यायालय आहे. त्यांच्यासमोर साक्षात त्यांचा ईश्वर असल्यामुळे पक्षपात किंवा आपपर भाव याला थारा नसतो. परस्पर विश्वास त्यांच्या संस्कृतीचा पाया आहे. या गावाला औपचारिक शिक्षणाची गरज भासली नाही. आपण जगज्जेता अलेक्झांडर यांच्याबरोबरच्या ग्रीक सैनिकांची वंशज आहोत, अशी त्यांची समजूत आहे. तथापि, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा हिंदू पुराणात दिसतात. त्यांच्या वांशिक मुळांबाबत वाद होऊ शकेलही, पण या गावातील लोकशाही व्यवस्था आणि प्राचीन ग्रीक व्यवस्थेतील साम्य वादातीत आहे. या गावात गांजाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, त्यांनी कधीही गांजाची विक्री केली नाही. ते गावाबाहेर केवळ लोकर विकतात. केंद्र सरकारने या मागास आदिवासी समुदायाची दखल घेऊन, त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि मलानावासीयांचा भारतीय मतदारांत समावेश झाला.
हिमाचलमध्ये स्वतंत्र देश
By admin | Published: January 06, 2017 2:10 AM