“जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:47 PM2021-06-30T12:47:16+5:302021-06-30T12:52:25+5:30

तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला शालेय शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे.

inder singh parmar told parents union on school fees if you want to die then die | “जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

“जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

Next
ठळक मुद्देभाजपच्या शिक्षणमंत्र्यांचे पालकांना धक्कादायक उत्तरतत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची काँग्रेसची भूमिकाशिक्षणमंत्र्यांनी माफी मागावी; पालकांची मागणी

भोपाळ: कोरोना संकटाच्या काळात शालेय परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षाला काही ठिकाणी सुरुवातही झाली. मात्र, शाळेच्या फीवरून अनेक ठिकाणी पालक आणि शाळा यांच्यात संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. अशातच मध्य प्रदेशामध्येशाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला शालेय शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. पालकांच्या तक्रारीवर जा आणि मरा, तुम्हाला हवं ते करा, असे धक्कादायक उत्तर परमार यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. (inder singh parmar told parents union on school fees if you want to die then die)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश पालक महासंघाच्या नेतृत्वात ९० ते १०० पालक इंदर सिंग परमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. पालकांनी इंदर सिंह परमार यांना मध्यस्थी करत फी कमी करण्यासाठी मदतीची विनंती केली. कोरोना संकटामुळे दैनंदिन खर्च भागवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळा जास्त फी घेत असल्याची तक्रार पालकांनी केली. मात्र, यावर संताप व्यक्त करत इंदर सिंह परमार यांनी पालकांना तुम्हाला मरायचं असेल, तर मरा. तुमची जी इच्छा आहे ते करा, या शब्दांत उत्तर दिले. 

अतिरिक्त फी घेण्यास हायकोर्टाची मनाई

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी अतिरिक्त फी घेऊ नये, असा मनाई आदेश मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही शाळा जास्त फी घेत असल्याची तक्रार घेऊन पालक इंदर सिंह परमार यांच्या घरी गेले होते. या प्रकरणी विरोधी पक्ष काँग्रेसने इंदर सिंह परमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच ते राजीनामा देणार नसतील, तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परमार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान, इंदर सिंह परमार यांनी पालकांची माफी मागावी. तक्रार ऐकण्याची इच्छा नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी पालक महासंघाचे अध्यक्ष कमल विश्वकर्मा यांनी केली आहे. इंदर सिंह परमार निर्लज्ज असल्याची टीका करत त्यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी केली आहे. 
 

Web Title: inder singh parmar told parents union on school fees if you want to die then die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.