'INDI आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश', PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:57 PM2024-07-30T21:57:46+5:302024-07-30T21:59:00+5:30
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
Anurag Thakur Speech : माजी केंद्रीय मंत्री आणि हमीरपूरचे भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur ) यांनी मंगळवारी(दि.30) लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाषणादरम्यान ठाकूर यांनी नाव न घेता राहुल गांधींकडे बोट दाखवत 'ज्याला स्वतःची जात माहित नाही, तो जात जनगणनेबद्दल बोलतो' असे म्हटले. यावर विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. मात्र, अनुराग ठाकूर यांना भाजप नेत्यांकडून भक्कम पाठिंबा मिळाला. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील त्यांचे कौतुक केले आहे.
This speech by my young and energetic colleague, Shri @ianuragthakur is a must hear. A perfect mix of facts and humour, exposing the dirty politics of the INDI Alliance. https://t.co/4utsqNeJqp
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सायंकाळी अनुराग ठाकूर यांचे लोकसभेतील भाषण मायक्रोब्लॉगिंग साइट X वर पोस्ट केले. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझा तरुण आणि उत्साही सहकारी अनुराग ठाकूर यांचे भाषण ऐकायलाच हवे. त्यांनी इंडी आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश करुन अतिशय चपखलपणे वस्तुस्थिती मांडली आहे."
राहुल यांच्या प्रत्येक आरोपाला अनुराग यांचे प्रत्युत्तर
अनुराग ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांच्या 'चक्रव्यूह'वाल्या टीकेवर जोरदार प्रहार केला आणि काँग्रेससह गांधी कुटुंबाचे वर्णन चक्रव्यूह असे केले.अनुराग ठाकूर म्हणतात, 'अभिमन्यूची हत्या सहा नाही, तर सात महारथींनी केली होती. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि महाभारताचे त्यांचे ज्ञानही अपघाती आहे. अभिमन्यूला जयद्रथ, दुर्योधन, दुशासन, कर्ण, कप्रिचार्य, शकुनी आणि द्रोणाचार्य, या सात योद्ध्यांनी मारले होते. हे त्या नेत्याशिवाय इतर सर्वांना माहीत आहे. राहुल गांधींनी महाभारत वाचले किंवा पाहिले आहे की नाही, हे कुणालाही माहीत नाही.
राजीव गांधी फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती SC,ST,OBC? सीतारमन यांचं वर्मावर बोट!
शशी थरूर यांच्या पुस्तकाचा उल्लेख
“मी महाभारतावरील एक नवीन पुस्तक वाचले. ते पुस्तक त्यांच्याच पक्षाचे खासदार (शशी थरूर) यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन नोबेल'. राहुल गांधी यांना महाभारत आणि चक्रव्यूहची संपूर्ण माहिती हवी असेल, तर ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. या कादंबरीत कोणत्या नेत्याला धृतराष्ट्र म्हटले आहे? कोणत्या पक्षाला कौरव म्हटले आहे? आणि कोण दुर्योधन आहे? हे राहुल गांधींना समजल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. हे लोक केवळ पुस्तके दाखवतात, पण वाचत नाहीत. ते संविधान दाखवत होते, मी विचारलं किती पानं आहेत, तेही सांगता आले नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांचा दंड; यूपी विधानसभेत 'लव्ह जिहाद' विधेयक मंजूर