इंडिया विरुद्ध भारत या राजकीय आरोप-प्रत्यारोपात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही उडी घेतली आहे. बुधवारी त्यांनी विरोधी आघाडी इंडियाला सुचवले की आपण स्वतःला भारत म्हणू शकतो. थरूर यांनी भारताचा फुलफॉर्मही सांगितला. असं केल्याने सत्ताधारी कदाचित पक्षाचे नाव बदलण्याचा हा खेळ थांबवतील असा दावाही शशी थरूर यांनी केला.
सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये थरुर म्हणाले, आम्ही निश्चितपणे स्वतःला अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी आणि रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (इंडिया) म्हणू शकतो. मग कदाचित सत्ताधारी पक्ष हा नाव बदलण्याचा खेळ थांबवेल.
बुधवारी खासदार शशी थरूर यांनी २०१५ ची आणखी एक घटना एका शेअर केली, जेव्हा एका जनहित याचिकाद्वारे देशाचे नाव बदलून फक्त भारत करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये बदल करून देशाचे नाव बदलण्याची गरज नाही. राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये देशाच्या अधिकृत नावासाठी इंडिया आणि भारत या शब्दांचा उल्लेख आहे.
ही पोस्ट शेअर करताना शशी थरूर म्हणाले, कोणत्याही टिप्पणीची गरज नाही. यावर केंद्र सरकारच्या संमतीने मी खूश आहे. घटनात्मकदृष्ट्या इंडियाला भारत म्हणण्यास हरकत नाही. मला आशा आहे की, देशाचे ब्रँड व्हॅल्यू असलेल्या इंडिया हे नाव पूर्णपणे सोडू नये. इतिहास जिवंत करणाऱ्या आणि जगभर ओळखल्या जाणार्या दोन्ही नावांचा वापर करण्यास आपण परवानगी दिली पाहिजे.
देशाचे नाव भारत असावे की इंडिया की दोन्ही असा वाद सध्या देशात सुरू आहे. पण या वादात एक वस्तुस्थिती अशी आहे की, हे दोन्ही शब्द आपल्या राज्यघटनेत आधीच लिहिलेले आहेत. इंडियाचा म्हणजेच भारताचा उल्लेख देशाच्या संविधानात आधीच केलेला आहे. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे राज्यघटनेत नोंदलेली आहेत आणि एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, मग वाद कशासाठी?, असा सवालही थरुर यांनी केला.
इंडिया विरुद्ध भारत लढतीत भाजप असो की काँग्रेस, प्रत्येकाने यू-टर्न घेतला आहे. देशाला इंडिया म्हणावे की भारत या विषयावर ७४ वर्षांपूर्वी १८ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेत चर्चा झाली. दोन्ही नावांसाठी वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले. पण शेवटी राज्यघटनेत इंडिया म्हणजे भारत असे लिहून वाद संपवला. मात्र गेल्या ७४ वर्षांत नावाचा वाद अनेकवेळा निर्माण झाला.