इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 09:58 AM2023-09-13T09:58:35+5:302023-09-13T09:59:40+5:30

आजची पहिली बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.

india alliance co ordination committee first meeting, discussed on seat allocation, sharad pawar, lok sabha election 2024 | इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा!

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा!

googlenewsNext

नवी दिल्ली : 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स'च्या (इंडिया ) समन्वय समितीची पहिली बैठक आज (१३ सप्टेंबर) होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि रणनीतीवर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजची पहिली बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीत विविध पक्षांच्या १४ नेत्यांचा समावेश आहे. आज संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भाजपा उमेदवाराच्या विरोधात विरोधी पक्षांकडून म्हणजेच इंडिया आघाडीकडून संयुक्त उमेदवार केला जावा, यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची ही बैठक महत्वाची आहे. कारण यापूर्वी वेगवेगळ्या घटक पक्षांची बैठक झाली आहे. सोशल मीडिया समिती आणि अभियान समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेवर समन्वय समिती चर्चा करणार असून त्यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे म्हटले जाते. यासोबतच सामूहिक कार्यक्रम आयोजनाची रुपरेषा देखील तयार केली जाऊ शकते. तसेच, या बैठकीत जागा वाटपावर देखील चर्चा होऊ शकते.

यादरम्यान समन्वय समितीच्या या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वतीन कोणताही नेता उपस्थित न राहण्याची शक्यता आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करत समन्वय समितीच्या पहिली बैठक १३ सप्टेंबर दिल्ली येथे होत आहे. पण ईडीने समन्स जारी केल्याने याच दिवशी मला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे म्हटले आहे. तसेच जदयूचे ललन सिंग हे देखील आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.

बैठकीपूर्वी समन्वय समितीचे सदस्य आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितले की, लोकांपर्यंत पोहोचणे, संयुक्त रॅलीचे नियोजन करणे आणि घरोघरी प्रचार करणे, यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, जी प्रत्येक राज्यासाठी वेगळी असणार आहे. तसेच, ही आघाडी यशस्वी करण्यासाठी त्यात सामील असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाला महत्त्वाकांक्षा, मतभेद आणि मतभिन्नता या तीन गोष्टींचा त्याग करावा लागेल, असेही राघव चढ्ढा म्हणाले.

Web Title: india alliance co ordination committee first meeting, discussed on seat allocation, sharad pawar, lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.