लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) या राष्ट्रीय पक्षांनी शनिवारी दिल्ली, गुजरात, हरयाणा, गोवा आणि चंडीगड अशा ३ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या ४६ जागांसाठी जागावाटपाची घोषणा केली. या ४६ जागांपैकी काँग्रेस ३९, तर ‘आप’ ७ जागांवर लढणार आहे.
मात्र, पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या ‘आप’ने राज्यातील लोकसभेच्या सर्व १३ जागा एकट्याने लढविण्याचे ठरविले आहे.समझोता झालेल्या जागांवर ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असून, या समझोत्याचा सन्मान काँग्रेस आणि ‘आप’चे नेते आणि कार्यकर्ते करतील, अशी ग्वाही उभय पक्षांनी कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीत काय घडले?nकेंद्रातील सत्ताधारी भाजपने २०१४ आणि २०१९ साली दिल्लीत लोकसभेच्या सर्व सातही जागा मोठ्या फरकाने जिंकताना २०१९ साली ५६.८६ टक्के मते मिळविली होती. काँग्रेसला २२.५१, तर ‘आप’ला १८.११ टक्के मते मिळाली होती.n‘आप’ने गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत.गुजरातेत काय घडले?nगुजरातमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व २६ जागांवर वर्चस्व राखताना ६२.२१ टक्के मते मिळविली होती, तर काँग्रेसला ३२.११ टक्के मते मिळाली होती. n२०२२ साली विधानसभा निवडणुकीत प्रथमच मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने १२.८२ टक्के मतांसह ५ जागा जिंकल्या होत्या.
पंजाबात ‘मैत्रीपूर्ण’ लढतपंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व १३ जागा सत्ताधारी ‘आप’ लढविणार असून, येथे काँग्रेसशी ‘मैत्रीपूर्ण’ लढत होईल. पंजाबचा, तसेच ‘आप’चा प्रभाव असलेला चंडीगड मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे.
चंडीगड महापालिकेमध्ये ‘आप’चे १४, तर काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले असून, काँग्रेस-‘आप’ आघाडीचे महापौर कुलदीपकुमार यांच्या निवडीवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
पंजाबमध्ये काँग्रेस आणि ‘आप’ वेगवेगळे का लढणार, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाष्य टाळले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पंजाबमध्ये १३ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. अकाली दल, भाजपने प्रत्येकी दोन, तर ‘आप’ने एका जागेवर विजय मिळविला होता. मात्र, त्यानंतर २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ऐतिहासिक बहुमत संपादन केले.