नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी एस. जयशंकर यांनी चीनच्या वांग यी यांना गलवान खोऱ्यातील भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाबाबत कडक शब्दांत सुनावले. "गलवानमध्ये जे घडले ते चीनचे पूर्वनियोजित आणि नियोजित होते, ज्यामुळे सर्व घटना घडल्या," असे एस. जयशंकर यांनी वांग यी यांना सांगितले. दरम्यान, चीन सीमेपासून मागे हटण्यास आणि शक्य तितक्या लवकर तणाव कमी करण्याचा प्रयत्न करेल, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, चीनने भारताच्या सीमेवर झालेल्या संघर्षाचा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवण्यास सहमती दर्शविली.
दरम्यान, लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "आपल्या जवानांचे शौर्य आणि त्याग हा देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात देश त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आम्हाला भारताच्या जवानांचा पराक्रम आणि त्यांच्या धैर्याचा अभिमान वाटतो." याचबरोबर, गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना आलेले वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे आहे. सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी शौर्य आणि साहस दाखवत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, असेही राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहीद जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. यावेळी, भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताने कधीच कोणावर आक्रमण केलेले नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत. शहीद झालेल्या जवानांनाही गर्व असेल की, त्यांना संघर्षात वीरमरण आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आणखी बातम्या...
India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह
दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव
ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत
21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...
चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग