नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांनी आज द्विपक्षीय करारांतर्गत त्यांच्या आण्विक ठिकाणांच्या यादीची देवाणघेवाण केली. दोन्ही देशांनी तीन दशकांहून अधिक काळ सुरू ही असलेली प्रथा सुरू ठेवली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील हा करार एकमेकांच्या अण्वस्त्रांवर हल्ला करण्यापासून रोखतो.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अण्वस्त्र आस्थापना आणि सुविधांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कराराचा एक भाग म्हणून आज भारत आणि पाकिस्तानने नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील अण्वस्त्र ठिकाणांच्या नावांची एकमेकांना माहिती दिली.
२७ जानेवारी १९९१ रोजी हा करार अंमलात आला-
भारत आणि पाकिस्तान या देशांमधील हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला आणि २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आला. या करारानुसार, दोन्ही देशांना प्रत्येक वर्षाच्या पहिल्या जानेवारीला समाविष्ट केल्या जाणार्या आण्विक ठिकाणांची एकमेकांना माहिती द्यावी लागेल. काश्मीर प्रश्नावर तसेच सीमेपलीकडील दहशतवादावरून दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान यादीची देवाणघेवाण झाली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यादींची ही सलग ३३वी देवाणघेवाण आहे, पहिली देवाणघेवाण १ जानेवारी १९९२ रोजी झाली होती.