पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. या ठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहाात स्वागत करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याकडे मांडल्याचे म्हटले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवरही चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांना कोणत्याही घटकाने त्यांच्या विचारांनी किंवा कृतीने दुखापत करणे मान्य नाही. पंतप्रधान अल्बानीज यांनी या संदर्भात उचललेल्या पावलांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला पुन्हा एकदा आश्वासन दिल्याचे पीएम मोदी म्हणाले. अशा घटकांवर कठोर कारवाई सुरूच ठेवणार आहे, असंही पीएम मोदी म्हणाले.
मोदी @ ९ पासून मित्र शिंदेंची शिवसेना दूरच; सामावून घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा दृष्टीकोन केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही. हे प्रादेशिक स्थिरता, शांतता आणि जागतिक कल्याणाशी देखील संबंधित आहे. काही दिवसांपूर्वी हिरोशिमा येथे झालेल्या क्वाड समिटमध्येही आम्ही इंडो-पॅसिफिकवर चर्चा केली होती. ग्लोबल साउथच्या प्रगतीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे सहकार्यही फायदेशीर ठरू शकते.
या वर्षी जानेवारी महिन्यात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी ऑस्ट्रेलियातील अनेक हिंदू मंदिरांना लक्ष्य केले होते. हे हल्ले मेलबर्न आणि ब्रिस्बेनमध्ये झाले. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरावर ४ मार्च रोजी हल्ला झाला होता. हल्ल्यासोबतच खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी मंदिराच्या भिंतींवर आक्षेपार्ह पेंटिंगही केली आहे. शनिवारी सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी लोक आले असताना हा हल्ला झाला. मंदिराच्या भिंतीवर दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि 'दहशतवाद', 'शीख १९८४ नरसंहार' असे शब्द लिहिले होते.
यापूर्वी खलिस्तान समर्थकांनी ब्रिस्बेनमधील गायत्री मंदिरात धमकीचे फोन केले होते. एका व्यक्तीने मंदिराचे अध्यक्ष डॉ. जय राम यांना फोन करून 'खलिस्तान जिंदाबाद'च्या घोषणादेण्यासाठी धमकी दिली. हिंदूंनी खलिस्तानच्या जनमत चाचणीला पाठिंबा द्यावा, असंही तो म्हणाला होता. यापूर्वी २९ जानेवारी रोजी खलिस्तान समर्थकांनी मेलबर्नमध्ये खलिस्तानसाठी जनमत संग्रह आयोजित करण्याची घोषणा केली होती. जेव्हा भारतीयांनी विरोध केला. त्यामुळे खलिस्तानी समर्थकांनी हिंसाचार केला होता.
१७ जानेवारीला मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला होता. मंदिराच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. यापूर्वी व्हिक्टोरियामध्येही मंदिरांवर हल्ले झाले होते. या हल्ल्यांनंतर ऑस्ट्रेलियन सरकारने अशा जबाबदार घटकांवर कारवाईचे आश्वासन दिले होते.