शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

कॅनडाच्या नेतृत्वाखालील बैठकीपासून भारत दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 3:56 AM

कोविड-१९ साथीविरुद्ध रणनीती ठरविण्यासाठी येत्या ७ डिसेंबर रोजी कॅनडाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 नवी दिल्ली - कोविड-१९ साथीविरुद्ध रणनीती ठरविण्यासाठी येत्या ७ डिसेंबर रोजी कॅनडाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास कॅनडाचे पंतप्रधान पी. एम. जस्टीन ट्र्युड्यू यांनी समर्थन दिल्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.सूत्रांनी सांगितले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे जयशंकर हे बैठकीला हजर राहू शकणार नाहीत, असे भारताने कॅनडास अधिकृतरीत्या कळविले आहे. कॅनडाचे परराष्ट्रमंत्री फ्रान्सिस्कॉईस-फिलिप शॅम्पेन यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. शॅम्पेन यांनी गेेल्या महिन्यात  आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीला जयशंकर यांनी हजेरी लावली होती. कोविड-१९ साथीविरोधात रणनीती ठरविण्यासाठी एक मंत्रीस्तरीय समन्वय समूह स्थापन करण्यात आलेला असून, त्याचे नेतृत्व कॅनडाचे परराष्ट्रमंत्री करीत आहेत.कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अधिकृत वक्तव्य जारी केल्यामुळे चिडलेल्या भारत सरकारने शुक्रवारी कॅनडाचे नवी दिल्लीतील राजदूत नादीर पटेल यांना बोलावून घेऊन आपली नाराजी कळविली होती. 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा