नवी दिल्ली : कामगारांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच भारत आज आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा संदेशातून केले आहे. ‘देशाचा कामगार हा राष्ट्रीय विकासाची चावी आहे आणि समाजाला परिपक्व आणि विकसित करण्यासाठी सहायक ठरत आहे. असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सरकारने नवे धोरण आणि चांगल्या योजना लागू केल्या पाहिजे,’ असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)परिश्रमाला मोदींचा सलामपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी कामगार दिनानिमित्त देशातील कामगारांना सलाम करीत शुभेच्छा दिल्या. कामगार देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावत आहेत, असे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. ‘आज कामगार दिनानिमित्त भारताच्या विकासात मोठी भूमिका बजावणाऱ्या असंख्य कामगारांचा दृढसंकल्प आणि परिश्रमाला माझा सलाम. श्रमेव जयते,’ असे मोदींनी म्हटले आहे.
कामगारांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच भारत आत्मनिर्भर होत आहे-सोनिया गांधी
By admin | Published: May 02, 2017 12:56 AM