इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 01:43 PM2024-01-13T13:43:10+5:302024-01-13T13:46:53+5:30
इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत.
विरोधकांच्या इंडिया आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. लवकरच जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. आज इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये १४ पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ऑनलाइन बैठकीत उपस्थिती दर्शवली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच संयोजकपदी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात आहे. कारण त्यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षांची एकजूट झाली. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडू याला विरोध केला जात आहे.
NCP chief Sharad Pawar attends the meeting of INDIA bloc leaders via video conferencing
— ANI (@ANI) January 13, 2024
The meeting is underway to review seat sharing, participation in Bharat Jodo Nyay Yatra and other issues.
(Pics source: NCP) pic.twitter.com/SAm6l9a8h4
इंडिया आघाडीची आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण इंडिया आघाडीला जागावाटप अंतिम करायचे आहे. तर काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती दररोज राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने काँग्रेसला लोकसभेच्या ४२ जागांपैकी २ जागांची ऑफर दिली आहे. फक्त दोन जागा असल्यामुळे टीएमसीची या ऑफरसाठी तयार नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. दरम्यान, टीएमसीशी संबंधित सूत्रांनी शुक्रवारी सांगितले की, टीएमसी बंगालमध्ये काँग्रेसला ३ जागा देण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी टीएमसीला आसाममध्ये दोन आणि मेघालयमध्ये एक जागा द्यावी लागेल.