बंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी स्पष्ट केले की, भारत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’चा प्रयत्न करू शकतो. दोन महिन्यांपूर्वी ७ सप्टेंबरला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न असफल झाला होता.इस्रोच्या प्रक्षेपण यान कार्यक्रमाचे दायित्व असलेल्या तिरुवनंतपुरमस्थित ‘विक्रम साराभाई अंतराळ केंद्रा’चे संचालक एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वात प्रस्तावित ‘चंद्रयान-३’वर अहवाल तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, समितीच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. पुढील वर्षीच्या अखेरीस मिशन तयारीसाठी दिशा- निर्देश देण्यात आलेले आहेत. नोव्हेंबरमध्ये अनुकूल काळ आहे.
पुढील वर्षी भारत पुन्हा करू शकतो चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:44 AM