अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमधील झाली चकमक ही चिंतेची बाब आहे. आंतरराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन केले जाऊ नये, असे जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमन यांनी म्हटले आहे. एका एका मुलाखती दरम्यान बोलत होते..
आपण चीनवर अधिक अवलंबून - जर्मनीभारत आणि युरोपीय युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कारारासंदर्भात एकरमन यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, जर्मनीला हा एफटीए हवा आहे. यामुळे, आमचा भारतसोबतचा व्यापार पूर्णपणे बदलेल. सध्या आम्ही चीनवर अधिक अवलंबून आहोत. आम्हाला इतर देशांसोबतही व्यापार वाढवा लागेल. दूर्दैवाने, आमच्या प्राधान्य क्रमात भारत तेवढ्या वरच्या पातळीवर नाही, जेवढे त्याने असायला हवे.
याच बरोबर लोकसंख्या आणि इतर काही कंगोऱ्यांचा विचार केल्यास, भारताशिवाय कुठलाही देश चीनचा सामना करू शकत नाही. लोक अजूनही व्हिएतनाम आणि मलेशियाकडे बघतात. त्यांचा दृष्टीकोन असा का आहे, हे मला माहीत नाही. कदाचित भारतातील संरक्षणवादी वातावरण आणि रेग्युलेशन्सची समस्या हे यामागील कारण असू शकते, असेही एकरमन म्हणाले.
तवांग चकमकीमुळे चिंतित -तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते. आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको. ते म्हणाले, इतर गोष्टींबरोबरच जेव्हा एनर्जी दराचा विषय येतो, निर्वासितांचा प्रश्न येतो. जेव्हा रशियाचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही युरोपात रशियाच्या या आक्रमकतेकडे युद्धाच्या स्वरुपात पाहतो.
एकरमन म्हणाले, आपल्याकडे तवांग चकमकीसंदर्भात पूर्ण माहिती नाही. मात्र तेथे हिंसाचार होत आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये हिंसाचार होत होता. पण आता तो पूर्वेकडील देशांमध्येही होऊ लागला आहे. हा चिंतेचा विषय आहे.