शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

India-China Conflict: फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 7:10 PM

India-China Conflict: चीनकडून भारतावर वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी सरकारने एसओपी जारी केला आहे.

India-China Conflict: 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. चीनकडून सीमेवर घुसखोरीची कारवाई अनेकदा सुरू असते. यासोबतच चीनकडून भारतातील इंटरनेट व्यवस्थेवर सायबर हल्ले होत असतात. अलीकडेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(एम्स)चा सर्व्हर हॅक झाला होता. हा चीनचा कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. या संस्थेतील महत्त्वाच्या लोकांचा डेटा त्यांनी डार्क वेबवर टाकला होता.

सरकारकडून SOP जारीचीनचा हा उद्दामपणा पाहून भारतही सतर्क झाला आहे. अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, त्यांनी आपल्या मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) च्या कर्मचार्‍यांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल-एसओपी जारी केला आहे. याचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

SOP म्हणजे काय?स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल म्हणजे काही काम करण्याचे मानक किंवा मान्यताप्राप्त मार्ग. चीनकडून सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्यांचा सामना करणाऱ्या भारताने इंटरनेट आणि कॉम्प्युटर वापरण्याच्या योग्य किंवा प्रमाणित पद्धतींबाबत ही SOP जारी केली आहे. केंद्र सरकारने आपली भूमिका मजबूत करण्यासाठी आणि मोठे नुकसान टाळण्यासाठी कडक देखरेखीसाठी अशी पावले उचलली आहेत.

ही कामे करावी लागतीलया अंतर्गत, सरकारने विविध मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) मधील कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळण्यास सांगितले आहे. यामध्ये मूलभूत आयटी कायदे लक्षात ठेवणे, वापरल्यानंतर संगणक बंद करणे, ईमेल साइन आउट करणे, वेळोवेळी पासवर्ड अपडेट करणे यांचा समावेश आहे.

...तर कारवाई होणारया प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्सनुसार, एम्समध्ये सायबर हल्ल्याचे मुख्य कारण एका कर्मचाऱ्याने येथे अशी खबरदारी घेण्यात निष्काळजीपणा दाखवल्याचे समोर आले आहे. एम्समधील कर्मचारी सहसा त्यांचे संगणक बंद करत नाहीत किंवा त्यांच्या ईमेल खात्यातून साइन आउट करत नाहीत. त्यामुळे हॅकर्सना एम्सच्या सर्व्हरवर हल्ला करण्याची संधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcyber crimeसायबर क्राइम