नवी दिल्ली : वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनमधील तणाव कमी झाला आहे, मात्र, चिनी सैन्याने अद्याप माघार घेतली नाही. पँगोंग आणि गोगरा भागात चीनचे सैन्य माघारी परतले नाही. या भागात सैनिकांची संख्या कमी करण्यात आली असली तरी अद्यापही दोन्ही देशांचे सैनिक अद्याप तैनात आहेत. गेल्या १५ दिवसांपासून फिंगर भागात कोणताही बदल झालेला नाही.
चिनी सैन्य अजूनही फिंगर -४ च्या रिज भागात तैनात आहे. तर फिंगर -४ मधून माघार घेऊन फिंगर -५ वर आपले लष्कर तैनात आहे. मात्र, गलवान आणि हॉट स्प्रिंग भागात डिसएंगेजमेंटची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांच्या लष्काराने आपल्या सैनिकांना माघारी बोलावले आहे.
कालच चीनने असा दावा केला की, जास्तकरून वादग्रस्त भागात त्याच्या डिसएंगेजमेंटची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. ग्लोबल टाईम्सने चिनी परराष्ट्र कार्यालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, पीपी १४, १५ आणि १७ ए पासून डिसएंगेजमेंटचे काम पूर्ण झाले आहे.ग्लोबल टाईम्सने असा दावा केला आहे की, पँगोंग लेकच्या फिंगर भागात डिसएंगेजमेंट सध्या झाले नाही. दोन्ही देशांच्या मुख्य कमांडरची आणखी एक बैठक लवकरच सुरु होईल. चीनने अशी अपेक्षा केली की, भारत या अर्ध्यवट मार्गाचे काम पूर्ण करेल आणि एकमत होईल.
दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती आता सुरळीत व शांत होण्याच्या दिशेने आली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कमांडर स्तरावरील चर्चेच्या पाचव्या फेरीतील उर्वरित प्रश्न सोडविण्याची तयारी सुरू आहे. कमांडर-स्तरावरील चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत आणि सीमा संबंध चर्चा आणि समन्वय यावर तीन बैठका झाल्या आहेत, असेही वांग वेनबिन यांनी सांगितले.
आणखी बातम्या...
राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका
कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित