शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

India China Face Off: भारताच्या चोख प्रत्युत्तरात चीनचे ३५ सैनिक जखमी वा मृत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 2:48 AM

अमेरिकी गुप्तचर यंत्रणांची माहिती; मेजर जनरल स्तरावर चर्चा सुरू

नवी दिल्ली : भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३५ चिनी सैनिकगंभीर जखमी किंवा मृत झाले असल्याची माहिती अमेरिकी गुुप्तचर यंत्रणच्या हवाल्याने देण्यात आली आहे.भारत व चिनी सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. गेल्या पाच दशकांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये इतकी मोठी चकमक पहिल्यांदाच घडली आहे. या घटनेनंतर गलवान खोºयातील तणाव संपविण्यासाठी भारत व चीनच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.गलवानमधील संघर्षात चीनचे किती सैनिक मारले गेले याबाबत अजून त्या देशाने कोणतीही माहिती दिलेली नाही. भारताइतकीच चीनचीही हानी झाली असून त्यांचे किती सैनिक मारले गेले याबद्दलची ठोस माहिती अद्याप मिळू शकलेली नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे. लडाखच्या पूर्व भागात असलेल्या गलवान खोºयातील परिस्थितीचा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी आढावा घेतला.चीनशी झालेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थ मंत्री निर्मला सीतारामन, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्याशी मंगळवारी रात्री एका बैठकीत सविस्तर चर्चा केली.

टॅग्स :chinaचीन