नवी दिल्ली : लडाखमध्ये चीननेभारतीय जवानांच्या पाठीत वार केला होता. मागे हटण्याचे सांगून काटेदार लाठ्या, दगडांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. याही परिस्थितीत सावरत जवानांनी दिलेल्या प्रत्यूत्तरात चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते. यामुळे चीनसीमेवर तणाव वाढला असून दोन्ही देशांचे जवळपास 1000 सैनिकांच्या गराड्यात शांतता चर्चा सुरु आहे. याच आठवडाभरात भारताने चीनच्या तब्बल 3488 किमी लांबीच्या सीमेवर भारतीय पायदळाची मोठी शक्ती तैनात केली आहे.
भारताने सैन्य दलांना चीनच्या प्रत्येक हल्ल्याचे जशासतसे किंवा त्याहून जास्त आक्रमक प्रत्यूत्तर देण्याची मोकळीक दिली आहे. यासाठी नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात चीनने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर भारताने चीनच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली होती. या एलएसीवर डोंगररांगा असल्याने तिथे लढण्यासाठी खास प्रशिक्षित केलेल्या जवानांची भलीमोठी फौजच तैनात करण्यात आली आहे. हे जवान चीनी ड्रॅगनच्या पश्चिमी, मध्य आणि पूर्वेकडील कोणत्याही हल्ल्याचा सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहेत.
भारतीय सैन्यातील एका मोठ्या बटालियनला केवळ पहाडी भागांमध्ये लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे प्रशिक्षण खूप खडतर होते. कारगिल युद्धानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे हे जवान डोंगररांगांमध्ये चपळाईने दुष्मनाला यमसदनी धाडू शकतात. चीन रस्तेमार्गे युद्धसामुग्री सीमेवर पोहोचवत आहे. तर आपले हे जवान त्यांना दिलेल्या ट्रेनिंगनुसार आधीच डोंगररांगांमध्ये लपले आहेत.
डोंगररांगांमधील लढाई खूप कठीण असते. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल आणि सिक्किममध्ये या जवानांसमोर कोणीही टिकू शकणार नाही. कोणतेही शस्त्र किंवा मिसाईल डागण्यासाठी या भागात अचुकतेचा कस लागतो. याचे कठोर प्रशिक्षण या जवानांना दिले आहे., असे एका माजी लष्करप्रमुखांनी सांगितले.
चीनला महाकठीणचीनने तिबेटच्या पठारावर युद्धसराव केला आहे. तेथील परिस्थिती आणि भारतीय सीमेवरील परिस्थिती खूप वेगळी आहे. तेथील पठार काहीसेच उंच सखल आहेत, तर भारतातील डोंगररांगा या अत्यंत दुर्गम आणि चढणी, उतरणीला कठीण आहेत. अशा भागावर केवळ कब्जा करणेच कठीण नाही तर तो टिकविणेही चीनसाठी खूप आव्हानात्मक असणार असल्याचे एका चीनी अभ्यासकाने सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली
...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा
शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा
चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा
देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले
चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग