नवी दिल्ली : लडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत चिनी सेनिकांनी भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीननेभारताच्या दोन मेजरसह 10 जवानांना बंदी बनवले होते. आता या जवानांना तीन दिवसांच्या बोलणीनंतर सोडण्यात आले आहे. मात्र अद्याप, यासंदर्भात लष्कराने अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्कराने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते, की याकारवाईत कुठलाही भारतीय जवान बेपत्ता झालेला नाही.
यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले.
India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा
गलवानमधील झटापटीत 76 जवान जखमी -लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 76 जवान जखमी झाले होते. यापैकी 18 जवान गंभीररित्या जखमी झाले. लेह येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर इतर 58 जवानांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
भारतीय आणि चिनी सैन्याच्या अधिकाऱ्यांत गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी मेजर जनरल-स्तरावरील बैठक पार पडली. यात, झालेल्या चकमकीबोरबरच गलवान खोऱ्याच्या जवळपासचा प्रदेशातील शांततेसंदर्भातही चर्चा झाली. येथे भारत आणि चिनी सैन्य 5 मेपासून समोरासमोर आहे.
गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO
भारत आणि चिनी सैन्याची पेंगाँग त्सोमध्येही झटापट -5 मेरोजी भारत आणि चिनी सैन्याची पेंगाँग त्सोमध्येही झटापट झाली होती. यानंतर भारतीय लष्कराने, पेंगाँग त्सो, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलतबेग ओल्डीतील सर्व वादग्रस्त भागांतून चिनी सैनिकांना मागे रेटण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत, निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात दोन्ही देशांत अनेकदा चर्चा झाल्या मात्र, त्याचा परिणाम आला नाही.
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'
15 जूनच्या रात्री हिंसक झटापट -15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे.या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह देशातील अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी यासंदर्भात सरकारकडे चीनला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे.
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण