नवी दिल्ली -लडाखमध्ये LACवर तणावाचे वातावरण आहे. अशातच, ''चिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले, तर आमचे जवान सेल्फ डिफेन्स (स्व-संरक्षणासाठी) गोळी चालवतील,'' असा इशारा भारतानेचीनला दिला असल्याचे सरकारी सूत्रांकडून समजते.
गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत-चीन संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. त्या घटनेनंतर चीनने भारताच्या पेट्रोलिंग पॉइंट्सवर मोठ्या प्रमाणावर आपले सैनिक तैनात केले आहेत. यानंतर भारताने पुन्हा असे झाले तर परिणाम भोगायला तयार रहा, असा इशाराही ड्रॅगनला दिला आहे. गलवानमधील घटनेनंतर, चीनच्या शांततेच्या आवाहनावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे स्पष्ट झाले आहे.
असा आहे भारताचा प्रस्ताव - लडाखमध्ये एलएसीवर भारत-चीन तणाव वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. यातच भारताने चीनला एक प्रस्ताव दिला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी माल्दो येथे झालेल्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत भारताने म्हटले आहे, चीनने सर्व ठिकाणांनवरून मागे सरकायला हवे. भारताच्या मते देपसांगमधील मैदानांपासून ते पेंगाँगच्या दक्षिणेकडील भागापर्यंत सर्व ठिकाणांवरून चीनने मागे सरकायला हवे. ही प्रक्रिया निवड केल्याप्रमाणे व्हायला नको. मात्र, चिनी सैनिकांनी सर्वप्रथम एलएसीवरून मागे सरकावे, हा प्रस्ताव चीनला अमान्य आहे. त्यांचे म्हणणे आहे, की भारतीय जवानांनी सर्वप्रथम दक्षिण पेगाँग त्सो भागातून मागे सरकायला हवे.
आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम
गलवान झटापटीनंतर भारत-चीन तणाव वाढला -जवळपास 40 वर्षांत पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये गलवानमध्ये झटापट झाली. चीनच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत सांगितले आहे. गलवानच्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणावात आणखी वाढ झाली. 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर चिनी सैनिकांनी पेगाँग सरोवराच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचे केलेले प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले होते. आधी चीनने पुढे सरकण्यास व सैन्य तैनातीस सुरुवात केली. त्यानंतर भारतही सरसावला आहे.
EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट
चीनी लष्कराची मोठी हानी -गलवान खोऱ्यातील झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तर काही जवान जखमी झाले होते. या घटनेत चीनी लष्कराची मोठी हानी झाली होती, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केला होता. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे संपादक हू शीजिन यांनी राजनाथसिंह यांच्या वक्तव्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण आपल्या ट्विटला जोडून ‘गलवानमधील संघर्षात भारतापेक्षा चीनचे कमी नुकसान झाले आहे, तसेच एकाही चिनी सैनिकाला भारताने ताब्यात घेतलेले नाही. उलट अनेक भारतीय सैनिकांना चिनी लष्कराने पकडले होते. चीनचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले, ही खोटी बातमी आहे’ असे म्हटले होते.
मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन