India China Faceoff: "लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहिदांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 09:24 AM2020-06-17T09:24:44+5:302020-06-17T09:31:18+5:30
India China Faceoff : देशभरात चीनविरोधात संतापाचे वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. गेल्या पाच आठवड्यांत पॅनगाँग सरोवर, गलवान खोरे, दौलत बेग औल्डी आदी भागांवरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. चीनने सीमेवरील लष्करी कुमक वाढविल्यानंतर भारतानेही वाढविली. परंतु नंतर लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा होऊन सैन्य माघारीवर सहमती झाली. मात्र दरम्यानच्या काळात सीमेवर आणलेले जास्तीचे 10 हजाराचे सैन्य वादरेषेच्या मागे घेण्यास चीन टाळाटाळ करत असल्यावरून पुन्हापुन्हा वादाचे मुद्दे उपस्थित होत आहेत. याच दरम्यान मोदी सरकारने मात्र मौन बाळगले असल्याची टीका होत आहे.
देशभरात चीनविरोधात संतापाचे वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच WeakestPMModi हा हॅशटॅगही वापरला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींवर हल्लाबोल केला आहे.
लहानसहान गोष्टींवर ट्वीट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत!
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 16, 2020
पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे.#WeakestPMModi
"लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत. पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे.#WeakestPMModi" असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केलं आहे. चीनी सैनिकांकडून लडाखमधील गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात घुसखोरी केल्याच्या वृत्तानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी 'भारताची भौगोलिक सुरक्षा आणि एकता याबाबत समझोता केला जाऊ शकत नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून चीनने गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. मागील पाच दशकांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एकही दुर्घटना घडलेली नाही. भारताचा एकही सैनिक भारत-चीन सीमेवर शहीद झालेला नाही. पण आता भारताचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत' असं म्हटलं आहे.
यदि सच,तो चीनी सैनिको द्वारा हमारे जांबाज,बहादुर अधिकारी व सैनिको की शहादत की खबरे बहुत ही भयावह व पूर्णतया अस्वीकार्य है
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 16, 2020
भारत की सुरक्षा व क्षेत्रीय अखंडता से कोई समझौता स्वीकार नही किया जा सकता
देश क्षुब्ध है,परंतु पीएम व रक्षा मंत्री ने पूरी तरह चुप्पी साध ली है
हमारा बयान- pic.twitter.com/MqK4wUGtnm
'आपले सैनिक सैनिक शहीद होणे ही बाब गंभीर आणि अस्वीकारार्ह आहे. संपूर्ण देश चिडलेला असताना पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मात्र गप्प बसले आहेत. या घटनेबाबत पंतप्रधानांनी देशासमोर उत्तर दिले पाहिजे. आपले सैनिक शहीद झाले असतील किंवा जखमी झाले असतील तर हे खरे आहे का हे जनतेला सांगितले पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री यावर गप्प का बसले आहेत' असा सवालही सुरजेवाला यांनी विचारला आहे.
India China Faceoff : तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीदhttps://t.co/w3HNbVb0tu#IndiaChinaFaceOff#IndianArmy#IndiaChinaBorder#SantoshBabu
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद
CoronaVirus News : तुमच्या घरात 'विषारी सॅनिटायझर' तर नाही ना?; CBI ने केलं अलर्ट, वेळीच व्हा सावध
भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...
"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"
Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...