नवी दिल्ली : लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून काँग्रेसनेते राहुल गांधी सातत्याने मोदींवर निशाणा साधत आहेत. ते या जवानांच्या मुद्द्यावर सातत्याने केंद्र सरकार समोर सवाल खडा करत आहेत.
रहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी जपान टाइम्सचा एक लेख ट्विट करत, 'नरेंद्र मोदी खरेतर सरेंडर मोदी आहेत', असे म्हटले आहे. भारताचेचीनबरोबरचे सध्याची धोरण शांततेचे आहे, असे जपान टाइम्सने म्हटले आहे.
PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा
यापूर्वी राहुल गांधी यांनी भारत आणि चिनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीच्या मुद्द्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या विधानावरून प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान म्हणाले होते, ना कुणी आपल्या सीमेत घुसले आहे, ना आपली कोणती पोस्ट दुसऱ्याच्या ताब्यात आहे. लडाखमध्ये आपल्या 20 वीर जवानांना हौतात्म्य आले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे तिरप्या नजरेने पाहिले, त्यांना ते धडा शिकवून गेले.
गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले
पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावर राहुल गांधी यांनी, जेथे भारतीय जवानांना वीरमरण आले, ती भूमी चीनची होती, तर मग आपल्या जवानांना का मारण्यात आले? त्यांना कोठे मारण्यात आले?, असा प्रश्न उपस्थित केला होता.
लडाखच्या गलवान खोऱ्यात 20 जवानांच्या बलिदानानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर, आता वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) सारखे पक्ष पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की सर्वपक्षीय बैठकीनंतर जो वाद सुरू झाला आहे, त्यानंतर मी चिंतीत आहे. ही वेळ एकी दाखवण्याची आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाने ट्विट केले, की ही वेळ राजकारणाची नव्हे रणनीतीची आहे.