India China Face Off: चीन मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक; ओवेसींना निमंत्रण नाही, पंतप्रधानांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 06:09 PM2020-06-19T18:09:06+5:302020-06-19T18:23:19+5:30

नुकतेच, भारतीय हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया दोन दिवसांच्या लेह दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लेह आणि श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. तसेच या दौऱ्याबरोबरच भारतीय लढाऊ विमानंही चीन जवळील हवाई एअरबेसवर पाठवण्यात आली आहेत.

India China Face Off: no invitation to AIMIM MP Asaduddin Owaisi for the all party meeting | India China Face Off: चीन मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक; ओवेसींना निमंत्रण नाही, पंतप्रधानांना लिहिलं पत्र

India China Face Off: चीन मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक; ओवेसींना निमंत्रण नाही, पंतप्रधानांना लिहिलं पत्र

Next
ठळक मुद्देएआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना या बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.  नाराज झालेल्या ओवेसींनी थेट पंतप्रधानांना एक पत्रही लिहिले आहे.या बैठकीला, सोनिया गांधी, एमके स्टालिन, एन. चंद्रबाबू नायडू, जगन रेड्डी, शरद पवार, नीतीश कुमार आदी बड्या नेत्यांचा सहभाग आहे.

नवी दिल्ली :भारत-चीन तणाव सातत्याने वाढत चालला आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे. या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. तसेच चिनला चोख उत्तर देण्याची मागणीही होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात अनेक पक्षांचे अध्यक्ष सहभागी होत आहेत. मात्र, एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना या बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. 

India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी

पंतप्रधानांनी बोलावलेल्या या बैठकीसाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यामुळे नाराज झालेल्या ओवेसींनी थेट पंतप्रधानांना एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. चीन बरोबर सीमेवर अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अशात ही बैठक अत्यंत महत्वाची आहे.

ओवेसींनी म्हटले आहे, "हे अत्यंत निराशाजनक आहे, की चीन सीमा मुद्यावर माझ्या पक्षाला आजच्या "ऑल पार्टी मीटिंग"साठी निमंत्रण देण्यात आले नाही. जी बैठक आपल्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे."

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

या नेत्यांची उपस्थिती निश्चित -
या बैठकीला, सोनिया गांधी, एमके स्टालिन, एन. चंद्रबाबू नायडू, जगन रेड्डी, शरद पवार, नीतीश कुमार, डी. राजा, सीताराम येचुरी, नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, सुखबीर बादल, चिराग पासवान, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, हेमंत सोरेन आणि मायावती, यांची उपस्थिती निश्चित आहे.

नुकतेच, भारतीय हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया  दोन दिवसांच्या लेह दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लेह आणि श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. हे दोन्हीही एअरबेस कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी महत्वाची आहेत. तसेच या दौऱ्याबरोबरच भारतीय लढाऊ विमानंही चीन जवळील हवाई एअरबेसवर पाठवण्यात आली आहेत.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

हवाई दलाने चीनच्या सीमेजवळच सुखोई - 30 एमकेआय, मिराज 2000, जगुआर ही लढाऊ विमानांसह, अमेरिकन अपाचे हेलीकॉप्टर्स, चिनूक हेलिकॉप्टर्स आदी देखील महत्वाच्या ठिकाणी तैनात केल्याचे समजते.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

Web Title: India China Face Off: no invitation to AIMIM MP Asaduddin Owaisi for the all party meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.