नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रामध्ये भारतीय बाजारावर चीनी कंपन्यांचा ताबा आहे. देशात विकल्या जाणाऱ्या 10 पैकी 8 कंपन्यांचे फोन हे चीनचे आहेत. सोमवारी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 20 जवान शहीद झाले आहेत. याविरोधात देशात संतापाची लाट उसळली असून चीनी उत्पादनांवर बहिष्कार आणि बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. याची धास्ती चीनची स्मार्टफोन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ओप्पोने घेतली आहे.
Oppo Find X2 या ५जी फ्लॅगशिप स्मार्टफोनचे बुधावारी दुपारी ४ वाजता लाँचिंग करण्यात येणार होते. मात्र, भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळल्याने कंपनीने हे लाईव्ह लाँचिंगच रद्द करून टाकले. मात्र, कंपनीने या फोनचा एक व्हिडीओ जारी करत गुपचूप लाँचिंग केले आहे.
ओप्पोचा भारतात एक असेंम्ब्ली प्लांट आहे. येथे अन्य ब्रँडचेही फोन असेम्बल केले जातात. कंपनी बुधवारी त्यांचा फ्लॅगशीप फोन Oppo Find X2 भारतीय बाजारात उतरवणार होती. कोरोनामुळे कंपनी ऑनलाईन इव्हेंट करणार होती. मात्र, याची यूट्यूब लिंक डिलीट करण्यात आली. यामुळे लाईव्ह लाँचिंग झालेच नाही. काल दुपारपर्यंत या इव्हेंटची लाईव्ह लिंक युट्यूब चॅनेलवर दिसत होती. तसेच ओप्पोच्या ट्विटरवरही या इव्हेंटची दोन दिवस राहिले, एक दिवस राहिला अशी जाहिरात करण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्ष लाँचिंगच्या दिवशी साधा फोटोसुद्धा पोस्ट करण्यात आला नाही.
लाईव्ह लाँचिंगच्या जागी ओप्पोने २० मिनिटांचा प्री रेकॉर्डेड व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये Find X2 भारतीय बाजारात उतरविण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच भारतातील कोरोना व्हायरस संक्रमणाला जास्त हायलाईट केले आहे. याशिवाय भारत सरकारकडून मास्क, सोशल डिस्टंन्ससारख्या केलेल्या आवाहनांनाही यामध्ये घेतले आहे. या लाईव्ह इव्हेंट रद्द केल्याबाबत ओप्पोने काही उत्तर दिलेले नाही.
सरकारचेही चीनविरोधात कडक धोरणटेलिकॉम मिनिस्ट्रीने सांगितले की, बीएसएनएलच्या 4G अपग्रेडेशनचे जुने टेंडर रद्द करण्यात येणार आहेत. हे टेंडर रद्द झाल्यानंतर चीनच्या कंपन्या पुन्हा टेंडर प्रक्रियमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. चीनची कंपनी ZTE चा BSNL सर्वात मोठा ग्राहक आहे. सेवा क्षेत्रामध्ये बीएसएनएलला मदत केली जाते. खासगी कंपन्या आधीपासूनच चीनवरील अवलंबित्व कमी करत आहेत. रिलायन्स जिओने ५ जी साठी चीनची कोमतीही मदत घेतली नसल्याचे अंबानी यांनी आधीच स्पष्ट केले होते. तर सध्या ZTE भारती एअरटेलसाठी 2 सर्कल आणि व्होडाफोनसाठी पांच सर्कलमध्ये काम करते. ZTE ही चीनची टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची साहित्य निर्माण करणारी कंपनी आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार
यंदा मला जिंकवा! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली चीनकडे मदत
Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल
घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल
उंची लहान, पण आत्मविश्वास दांडगा होता; हे लेफ्टनंट ठरणार प्रेरणादायी
India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता